Relationship Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : नवऱ्याकडून बायकोला हव्या असतात या ५ गोष्टी, वेळीच मिळाल्या तर नात्यात टिकून राहातो गोडवा

कोमल दामुद्रे

5 Things Women Desperately Want from Men :

नातं कोणतेही असो त्याला टिकवण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतात. आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नांमुळे आपले नाते मजबूत होते. पती-पत्नीच्या नात्याचा विचार करताना बऱ्याचदा याला अधिक महत्त्व दिले जाते.

कोणत्याही नात्यात (Relation) प्रेम, आदर आणि समजुतदारपणा असणे अधिक महत्त्वाचे आहे. लग्न झाल्यानंतर बायकोला आपल्या नवऱ्याकडून अधिक अपेक्षा असतात. आणि जर त्यावेळीच मिळाल्या तर त्या पतीला आनंदी ठेवू शकतात.

स्त्रियांना पतीकडून (Husband) काय हवे असते? त्यांच्या गरजा समजून घेणे ही प्रत्येक नवऱ्याची जबाबदारी आहे. सुखी आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी प्रत्येक पतीने काही गोष्टी लक्षात ठेवायला हवी. जाणून घेऊया त्याबद्दल

1. प्रेम आणि सपोर्ट

प्रत्येक स्त्रीला तिच्या पतीकडून प्रेम आणि भावनिक आधाराची अपेक्षा असते. पत्नीला आपल्या नवऱ्याकडून प्रेम आणि साथ हवी असते. प्रेम व्यक्त केल्याने त्यांना आनंद मिळतो. तसेच नाते अधिक मजबूत होते. त्यामुळे वैवाहिक (Married) नाते अधिक चांगले टिकून राहाते.

2. काळजी घेणारा नवरा

तुमचे तुमच्या पार्टनरवर किती प्रेम आहे हे काळजीमधून व्यक्त करा. आपल्या पत्नीला घरकामात मदत करा. तिची मनस्थिती खराब असेल, तिची तब्येत खराब असेल तर तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करा, तिच्यासाठी वेळ काढा.

3. आदर

कोणतेही नात्याचा पाया असतो एकमेकांचा आदर करणे. आदर मिळवण्यासाठी खरेतर आजही महिलांना संघर्ष करावा लागतो. पतीने फक्त प्रेमच नाही तर त्यांच्या मताला समजून घेणे देखील अधिक महत्त्वाचे आहे. त्यांच्या स्वाभिमान दुखवू नका.

4. संवाद

अनेकदा नात्याला वेळ दिला नाही की, संवाद हरवतो. त्यामुळे नवरा-बायकोमध्ये सततची भांडणे होतात. पत्नीची इच्छा असते की, पतीने सर्व काही शेअर करावे. तसेच नात्यात एकमेकांवर विश्वास असणे देखील महत्त्वाचे आहे. पत्नीला एकटे किंवा असुरक्षित वाटणार नाही याची काळजी घ्या.

5. समजूतदारपणा

पती-पत्नीच्या नात्यात समंजसपणा हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. बरेचदा स्त्रिया रागात व्यक्त होतात. तुला काही समजत नाही, कळत नाही अशाप्रकारे बोलतात. यासाठी पतीने पत्नीला समजून घ्यावे. तिच्या आवडीनिवडी समजून घ्याव्यात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT