heart blockage symptoms google
लाईफस्टाईल

Heart Blockage Symptoms: छातीत सतत जळजळ होतेय? अ‍ॅसिडीटी नाही, तर रक्तवाहिन्या ब्लॉकेजचा धोका, वाचा लक्षणे आणि उपाय

Heart Pain: हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजची लक्षणं अनेकदा स्पष्ट दिसत नाहीत. छातीत वेदना, मळमळ, चक्कर, घशात वेदना अशी साधी लक्षणं ओळखा आणि वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Sakshi Sunil Jadhav

छातीत वेदना, डाव्या हाताला वेदना, मळमळ अशी लक्षणं हृदयविकाराची संबंधीत असू शकतात.

महिलांमध्ये लक्षणं वेगळी दिसतात, त्यामुळे दुर्लक्ष करू नका.

५० वर्षांवरील आणि कोलेस्ट्रॉल वाढलेल्यांनी नियमित तपासणी करावी.

वेळेवर निदान आणि उपचार केल्यास हृदयविकाराचा धोका टाळता येतो.

हार्टच्या आरोग्याबाबत अनेकांच्या मनात एक गैरसमज आहे की, शरीरात काही बिघाड झाला तर ते ताबडतोब संकेत देईल. पण तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येकवेळी असे स्पष्ट संकेत मिळत नाहीत. काहीवेळा हार्टशी संबंधित समस्या छातीत वेदना न होता इतर भागांमध्ये दिसू शकतात, त्यामुळे अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात.

विशेषतः वय ५० पेक्षा जास्त, जास्त वजन, कोलेस्ट्रॉल वाढलेला किंवा रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्टच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका जास्त असतो. डॉक्टर सांगतात की, काही साधे लक्षणे वेळेत ओळखली तर मोठा धोका टाळता येतो.

पहिलं आणि सगळ्यात सामान्य लक्षण म्हणजे छातीत वेदना होणे किंवा ताण जाणवणे. जर रक्तवाहिन्या पूर्णपणे ब्लॉक झाल्या असतील, तर छातीत दाब, जळजळ, कडकपणा किंवा ताण जाणवतो. ही भावना काही मिनिटे टिकते आणि कधी विश्रांतीत, तर कधी शारीरिक क्रियेमध्येही दिसते. परंतु वेदना क्षणिक असेल आणि दाबल्यावर वाढत असेल तर ती स्नायूंच्या वेदनांमुळे असण्याची शक्यता असते.

काही लोकांना मळमळ, जळजळ किंवा उलट्या होतात. विशेषतः महिलांमध्ये हे लक्षण जास्त दिसते. दुसरं सामान्य लक्षण म्हणजे डाव्या हाताकडे पसरत जाणारी वेदना. ही वेदना छातीपासून हातापर्यंत जाते आणि हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो.

तिसरं लक्षण म्हणजे चक्कर येणे. शरीरात पाणी कमी झाल्याने, उपाशी राहणं किंवा अचानक उठल्यानेही असं होऊ शकतं. मात्र जर छातीत वेदना आणि श्वास घेण्यास त्रास यासोबत जाणवत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. कधी कधी घशात वेदना जाणवतात.

जर ही वेदना छातीतील ताणासोबत असेल आणि वरच्या दिशेने पसरत असेल, तर ती हृदयविकाराची लक्षणं असू शकतात. अशा वेळी स्ट्रेस टेस्ट किंवा इतर वैद्यकीय तपासणीद्वारे हृदयातील ब्लॉकेज आहे का हे समजून घेता येतं.

टीप

तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जावे. वेळेवर निदान आणि उपचार केल्यास हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येतो.

हार्ट ब्लॉकेज म्हणजे काय?

हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी किंवा कोलेस्ट्रॉल साचल्याने रक्तप्रवाह अडतो, त्यालाच ब्लॉकेज म्हणतात.

हृदय ब्लॉकेजची लक्षणं कोणती असतात?

छातीत वेदना, डाव्या हातात वेदना, मळमळ, चक्कर, घशात ताण अशी लक्षणं दिसू शकतात.

महिलांमध्ये ही लक्षणं वेगळी असतात का?

महिलांमध्ये मळमळ, थकवा, जळजळ ही लक्षणं अधिक आढळतात.

वेळेत निदान कसं करावं?

डॉक्टरांच्या सल्ल्याने स्ट्रेस टेस्ट, ईसीजी, आणि ब्लड टेस्ट करून ब्लॉकेज ओळखता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT