Habits That Make You Instantly Likeable Saam Tv
लाईफस्टाईल

Habits That Make You Instantly Likeable : सगळ्यांच्या मनावर गाजवायच आहे अधिराज्य ! आपल्या दैनंदिन जीवनात 'या' सवयींना फॉलो करा

How To Impress : स्वतःला मजबूत आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व बनवणे गरजेचे आहे असे केल्याने लोक तुमच्या आयुष्याचा एक भाग बनतील.

कोमल दामुद्रे

Improve Personality : काही लोक त्यांच्या स्वभावामुळे लगेच समोरील व्यक्तीच्या हृदयात स्थान निर्माण करतात. तर काही लोकांना असे करणे जरा अवघड जात असते. त्यामुळे स्वतःला मजबूत आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व बनवणे गरजेचे आहे असे केल्याने लोक तुमच्या आयुष्याचा एक भाग बनतील.

खरं सांगायचे तर कोणालाच कंटाळवाणी किंवा रोबोटिक लोकांसोबत राहायला आणि वेळ (Time) घालवायला आवडत नाही. त्यामुळे तुमच्या सवयमध्ये या काही गोष्टींचा समावेश करा ज्याने तुम्ही प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवू शकाल.

1. लोकांसारखे वागणे

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटलात तर त्या व्यक्तीशी त्याच्यासारखे वागलात तर समोरची व्यक्ती तुमच्या सोबत सहजपणे जोडली गेली आहे असे वाटते.त्यासाठी त्यांचे वागणूक, मुद्रा,डोळ्यांचा संपर्क,स्मितहास्य,बोलण्याची पद्धत, देहबोली या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष दया आणि त्यांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करा.

2. तुमच्या बॉडी लँग्वेजवर लक्ष ठेवा

खास व्यक्तीशी बोलताना टक लावून पाहू नका,त्यांच्याशी डोळसपणे बोला.आपल्याला होणाऱ्या संभाषणात स्वारस्य आहे हे दाखवण्यासाठी डोके हलवत रहा. त्यात स्वतःला उत्साही दर्शवण्यासाठी मध्येच हात हलवत रहा दरम्यान चेहऱ्यावर स्मित हास्य राहून द्या. या सर्व गोष्टींचा लोकांच्या मनावर सकारात्मक (Positive) परिणाम होतो.

3. लोकांना नावाने हाक मारा

जेव्हा तुम्ही कोणाला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्यांना नाव विचारा. संभाषण होत असताना अनेक वेळा त्यांचा नावाचा वापर करा त्यामुळे तुम्हाला त्यांचे नाव लक्षात राहील आणि समोरची व्यक्ती तुमच्याशी लगेच संपर्क साधू शकेल.

Habits That Make You Instantly Likeable

4. वेळ आल्यावर फ्रँक व्हा

दुसऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही जितके स्पष्ट बोलान तितकेच त्यांच्याशी जवळीक साधता येईल. कधी आणि कुठे फ्रँक होयायचे आहे हे समजणे गरजेचे आहे. एकदमच सर्व काही आपल्याबद्दल सांगू नका हळूहळू आपल्याबद्दल सांगा. नेहमी लहान चर्चानी सुरवात करा. त्यानंतर हळूहळू समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आणि नापसंती विषयी माहिती मिळवा.

5. कमी बोला

जर तुम्हाला जास्ती बोलायला आवडत नसेल तर हे इतर लोकांसमोर तुमची इमेज खराब करू शकते.त्यामुळे यासाठी लोकांना प्रश्न विचारून त्यांना जास्ती बोलण्याची संधी द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT