Petrol Diesel Price: 5 राज्यातील विधानसभा निकालानंतर इंधनाचे नवे दर जाहीर Saam Tv
लाईफस्टाईल

Petrol Diesel Price: 5 राज्यातील विधानसभा निकालानंतर इंधनाचे नवे दर जाहीर

उत्तर प्रदेशबरोरबच ५ राज्यामधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: गुरुवारी उत्तर प्रदेशबरोरबच ५ राज्यामधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देशात पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे (Petrol- Diesel Rates) दर जाहीर करण्यात आले आहेत. आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. पेट्रोल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार देशात आज देखील इंधनाचे (fuel) दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणाताही बदल करण्यात आला नाही.

हे देखील पहा-

विधानसभा निवडणूक (Assembly elections) होताच पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये वाढ होणार आहे, असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, आज देखील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. ४ नोव्हेंबर २०२१ दिवशी पेट्रोल, डिझेलवर टॅक्स कमी करण्यात आल्याने पेट्रोल प्रति लिटर ५ रुपये तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

ओसीएलकडून मिळालेल्या माहितीनुसार आज राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रती लिटर ९५.४१ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ८६.६७ रुपये एवढा आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०९.९८ व ९४.१४ रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये १ लिटर पेट्रोलसाठी १०४.६७ रुपये आणि डिझेलसाठी ८९.७९ रुपये आकारले जात आहेत. तर चेन्नईमध्ये १ लिटर पेट्रोलचा दर १०१.४० रुपये तर डिझेलचा दर ९१.४३ रुपये एवढा आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT