Best Mobile Phone Saam Tv
लाईफस्टाईल

Best Mobile Phone : हे आहेत 'या' वर्षातील 5 बेस्ट फोन, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सही दमदार !

35000 च्या अंतर्गत येणारे टॉप 5 स्मार्टफोन बद्दल बहुतेकांना याविषयी कल्पना नसेल.

कोमल दामुद्रे
Mobile phone

2022 मधील सर्वात चांगले फोन्स आपल्याला पाहायला मिळाले परंतु, 35000 च्या अंतर्गत येणारे टॉप 5 स्मार्टफोन बद्दल बहुतेकांना याविषयी कल्पना नसेल. चांगले स्पेसिफिकेशन्ससह या फोन्समध्ये तुम्हाला उत्तम कॅमेरा (Camera) देखील मिळेल.

Smartphone

जर आपण या रेंजच्या फोनबद्दल बोललो तर, OnePlus Nord 2T, Google Pixel 6a आणि Xiaomi 11T Pro 5G हायपरफोन सारखे दमदार फोन्स आहेत. या वर्षभरात खूप चर्चेत राहिलेल्या या स्मार्टफोन्सबद्दल (Smartphone) जाणून घेऊया.

Google Pixel 6A:

Pixel 6 च्या तुलनेत, Google Pixel 6A हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये युजरला त्याच्या फोनमध्ये हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतात. या फोनमध्ये 6.1-इंचाचा FHD+ डिस्प्ले उपलब्ध आहे. हा फोन ड्युअल कॅमेरा सेटअप सह येतो. यात 12.2 मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा आहे आणि 12 मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा उपलब्ध आहे, याशिवाय, समोर 8 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे. या फोनची बॅटरी बॅकअप 4410mAh आहे. या फोनमध्ये 6 GB रॅम + 128 GB स्टोरेज आहे. या फोनची किंमत 29,999 रुपये आहे.

Xiaomi 11T Pro

5G Xiaomi 11T Pro या वर्षी वापरकर्त्यांची पसंती आहे. या फोनमध्ये तुम्हाला एक मोठा 6.7-इंचाचा डिस्प्ले, फोटो आणि व्हिडिओसाठी 108-मेगापिक्सेल कॅमेरा मिळतो, या फोनमध्ये 120-वॉट हायपरचार्ज तंत्रज्ञान आहे, जे 17 मिनिटांत 5000mAh बॅटरी पूर्णपणे चार्ज करू शकते. यात 8 जीबी रॅम अधिक 128 जीबी स्टोरेज आहे. तुम्हाला हा फोन अपर-मिड रेंजमध्ये 33,990 रुपयांना मिळेल.

OnePlus Nord 2T

OnePlus Nord 2T ला भारतामध्ये टॉप फोनच्या यादीत खूप मागणी आहे, या फोनमध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे. 50 मेगापिक्सेल कॅमेरा आहे, यामध्ये तुम्हाला 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी, 8GB रॅम अधिक 128GB स्टोरेज पर्याय, या फोनची किंमत 28,999 रुपये आहे.

Nothing Phone 1

या वर्षातील सर्वोत्कृष्ट दिसणार्‍या फोनबद्दल बोलायचे झाले तर Nothing Phone 1 पहिल्या क्रमांकावर येईल, हा फोन दिसायला चांगला आहे तसेच हा फोन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या बाबतीतही मजबूत आहे, याचा डिस्प्ले 6.55 इंच आहे. डिस्प्ले, फोन ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो, त्याचा मागील मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेल आहे. याची बॅटरी 4500 mAh आहे, या फोनमध्ये 8GB प्लस रॅम प्लस 128GB स्टोरेज आहे, फोन स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटने सुसज्ज आहे, हा फोन तुम्हाला 28,999 रुपयांना मिळतो.

iQOO Neo 6

iQOO Neo 6 या वर्षी या फोनची खूप चर्चा झाली आणि या फोनची विक्रीही चांगली झाली. फोनमध्ये 6.2-इंचाचा डिस्प्ले, 64-मेगापिक्सेल कॅमेरा आणि 4700mAh मजबूत बॅटरी, 8 GB रॅम अधिक 128 GB स्टोरेज उपलब्ध आहे, या फोनची किंमत 28,999 रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saina Nehwal: सायना नेहवाल - पारूपल्ली कश्यप विभक्त, ७ वर्षांचा सुखी संसार मोडला; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT