5 Bad Habits that can speed up your ageing process
5 Bad Habits that can speed up your ageing process Saam Tv
लाईफस्टाईल

5 Bad Habits : वयाच्या २५ व्या वर्षी वृद्ध बनवतील तुमच्या 'या' ५ सवयी, चेहऱ्यावर दिसू लागतील सुरकुत्या !

कोमल दामुद्रे

5 Bad Habits : वयाआधीच वृद्ध दिसणे कोणालाच आवडत नाही. साहाजिक आहे तुम्हालाही असेच वाटत असेल पण तुमच्या अशा काही सवयी ज्या नकळतपणे तुम्हाला वृद्ध दिसण्यास भाग पाडू शकतात.

बाहेरचे खाणे, सतत एका ठिकाणी बसणे,कमी झोप घेणे,चेहऱ्याची योग्य न काळजी घेणे इत्यादी काही कारणांमुळे तुम्ही वृद्ध दिसू शकता म्हणून तीस वर्षाचे लोक पन्नास वर्षाची दिसू लागतात त्याचे हे कारण असू शकते. तुमच्या अशा कोणत्या सवयी आहेत जे तुम्हाला वयाआधी वृद्ध बनवू शकतात त्या आज आपण येथे सविस्तरपणे जाणून घेऊया.

1. पुरेशी झोप न होणे

आपल्या आरोग्यासाठी (Health) रोज कमीत कमी सात ते आठ तास झोपलेच पाहिजे जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यसह त्वचेवर दिसून येते. झोपेच्या कमतरतेमुळे एक्झिमा आणि सोरायसिस या त्वचेच्या संबंधित समस्या वाढू शकतात.

पूर्ण न झाल्यामुळे डोळ्याखाली (Eye) डार्क सर्कल वाढतात. झोप पूर्ण न झाल्याने वृद्धत्वाची समस्या झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. कमी झोपेमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात म्हणून रोज ७-८ तास समस्या पासून दूर राहाल.

Skin care

2. कमी पाणी पिणे

कमी पाणी (Water) प्यायल्याने हायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात त्याचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्वचा (Skin) कोरडी पडते. डेड स्कीनच्या समस्या अधिक जास्ती वाढू शकतात. दिवसातून कमीत कमी तीन लिटर तरी पाणी पिणे गरजेचे आहे त्यामुळे मूत्रपिंडसुध्दा निरोगी राहण्यात मदत होईल.

3. खूप वेळ बसण्याची सवय

सतत एका ठिकाणी बसण्याची सवय तुम्हाला तरुणपणातच वृद्ध बनवते. काही लोकांना काम करण्याची सवय नसते त्यामुळे ते सतत एका ठिकाणी बसून राहतात या सवयीमुळे तुमचे आरोग्य धोक्यात पोहोचू शकते. एका अहवालानुसार बसल्यामुळे आपल्या पेशी लवकर वृद्ध होतात त्याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो आणि त्वचा वृद्ध दिसू लागते.

4. खराब आहार (Food)

जर तुम्हाला बाहेरील तळलेले पदार्थ,कॉफी,साखरयुक्त पेय यांचे सेवन करायची सवय असेल तर ते आत्ताच बंद करा अन्यथा त्यांचा परिणाम तुमच्या त्वचेवर होऊन तुमची त्वचा वृद्ध दिसू शकते.

तुमच्या आहारात पोषक फळे,भाज्यांचा समावेश करा त्यामुळे तुमची त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यास मदत होईल. चेहऱ्याच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही रोज व्यायाम किंवा योगासने करू शकता त्यामुळे तुमचे ब्लड सर्क्युलेशन सुद्धा बरोबर राहते.

5. चुकीच्या ब्युटी प्रॉडक्टची निवड

ब्युटी प्रॉडक्ट वापरण्याआधी तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून तुम्ही ब्युटी प्रॉडक्ट वापरले पाहिजे जर तुम्ही कोणतेही ब्युटी प्रॉडक्ट वापरत असेल तर त्याचा चुकीचा परिणाम तुमच्या त्वचेवर होऊन तुमची त्वचा कोमजलेली दिसू शकते.

त्याची योग्य ती काळजी घेणे फार महत्त्वाचे असते त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेत असल्यास त्वचा दीर्घकाळ तरुण राहते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Criminal Justice 4 Announcement : पंकज त्रिपाठी हाती आला नवा खटला; क्रिमिनल जस्टीसच्या चौथ्या भागात कोणाला देणार न्याय

Viral Video: भयानक! भररस्त्यात धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट; पुढे जे घडलं ते... थरारक VIDEO समोर

Avinash bhosale : उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन

EPF Balance: एक मिस्ड कॉल द्या अन् ईपीएफ बॅलेंस चेक करा; वाचा सविस्तर

Latur Water Crisis | टँकर आला की हंडा घेऊन पळतात, लातूर जिल्ह्यात भीषण परिस्थिती!

SCROLL FOR NEXT