हिंदू धर्मात एकदा का तुळशी विवाह झाला की, लग्नाचे हंगाम सुरु होतात. ज्यांचे विवाह यंदा ठरणार आहेत, त्यांच्यासाठी पुढील माहिती आनंदाची असणार आहे. यंदा १२ नोव्हेंबर २०२४ मंगळवारी तुळशी विवाह संपन्न होणार असून १८ नोव्हेंबर २०२४ रोजी लग्नसराईतला पहिला शुभ मुहूर्त असणार आहे.
२०२४ रोजी एकूण किती शुभ मुहूर्त असतील?
आता वधूवरांना गुडघ्याला बाशिंग बांधून तयार राहण्याचा मुहूर्त आला आहे. यंदाच्या सालात एकूण ५२ शुभ मुहूर्त असणार आहेत. हिंदू धर्मानुसार जेव्हा तुळशी विवाह होतो तेव्हा दिवाळी सणाची सांगता होते. तसेच अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत त्यामुळे पाहूण्यांचे येणे जाणे सुरूच आहे. त्यातच लग्नसराईचे शुभ मुहूर्त सुरू होणार आहेत.
यंदाचे शुभ मुहूर्त किती तारखे पर्यंत असणार आहेत?
या वर्षी म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२४ पासून शुभ मुहूर्त सुरू होणार आहेत. म्हणजेच दोनाचे चार हात करण्याचा समारंभ हा सुरू होणार आहे. यात ५२ शुभ मुहूर्त असणार आहेत. तर याचा शेवट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ सालाच्या जून महिन्यात असणार आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ४ तारखेला हा शुभ मुहूर्त समाप्त होणार आहे.
यंदा कोणत्या महिन्यात कोणत्या दिवशी शुभ मुहूर्त असेल?
यंदाच्या लग्नाचे सर्वाधिक शुभ मुहूर्त पुढील प्रमाणे असणार आहेत:
नोव्हेंबर २०२४ मधील शुभ मुहूर्त दि. १८, २२, २५, २७
डिसेंबर २०२४ मधील शुभ मुहूर्त दि. १, २, ५, ६, ११
जानेवारी २०२५ मधील शुभ मुहूर्त दि. १६, १९, २०, २३, २४, २९, ३०
फेब्रुवारी २०२५ मधील शुभ मुहूर्त दि. २, ३, ७, १६, १९, २०, २१ २३, २६
मार्च २०२५ मधील शुभ मुहूर्त दि. २, ३, ६, ७
एप्रिल २०२५ मधील शुभ मुहूर्त दि. २०, २२, २३, २५, २६, २८, ३०
मे २०२५ मधील शुभ मुहूर्त दि. १, ७, ८, ९, ११, १८, १९, २२, २३, २५, २८
जून २०२५ मधील शुभ मुहूर्त दि. १, २, ३, ४ असे एकूण शुभमुहूर्त आहेत.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
Written By: Sakshi Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.