2023 Yamaha Aerox 155
2023 Yamaha Aerox 155  Saam TV
लाईफस्टाईल

Yamaha Aerox 155 स्कूटर भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

2023 Yamaha Aerox 155 launched : प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Yamaha Motor India ने Aerox चे 2023 प्रकार लॉन्च केला आहे. कंपनीने या नवीन स्कूटरची किंमत 1,42,800 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवली आहे.

Aerox ला 2023 साठी नवीन रंग पर्यायसह लॉन्च करण्यात आलं आहे. कंपनी मेटॅलिक ब्लॅक, रेसिंग ब्लू आणि ग्रे वर्मिलियन या तीन कलर स्कीममध्ये Yamaha Aerox विकते. 2023 प्रकारात ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम आहे, जी स्कूटरमधील सेगमेंट-फर्स्ट फीचर आहे.

2023 Yamaha Aerox 155 launched : इंजिन

Yamaha Aerox आता E20 इंधनावरही चालेल. याशिवाय स्कूटरच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे व्हेरिएबल व्हॉल्व्ह अॅक्ट्युएशन (VVA) सह सुसज्ज 155cc ब्लू कोअर इंजिनद्वारे समर्थित आहे. Yamaha R15 मध्ये आढळणारे हेच इंजिन आहे. परंतु Aerox 155 साठी ट्यून केलेले आहे. हे आता सीव्हीटी ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. इंजिनच्या पॉवर आउटपुटबद्दल बोलायचे झाले तर ते 8,000rpm वर 14.8bhp पॉवर आणि 6,500rpm वर 13.9Nm चा पीक टॉर्क आउटपुट जनरेट करते. (Latest Auto News in Marathi)

2023 Yamaha Aerox 155 launched : फीचर्स

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास Arox ला LED पोझिशनिंग लॅम्पसह LED हेडलाइट, एक LED टेल लॅम्प, मोबाईल चार्ज करण्यासाठी फ्रंट पॉवर सॉकेट आणि मल्टी-फंक्शन की मिळते. यात ग्राहकांना 24.5 लीटर सीट स्टोरेज देखील मिळणार आहे.

2023 Yamaha Aerox 155 launched : स्पेसिफिकेशन

हार्डवेअरच्या बाबतीत यात 14-इंच अलॉय व्हील्स, 140-सेक्शन मागील टायर, पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन गॅस-चार्ज केलेले शॉक Absorber आहेत. यामाहाने सस्पेंशन सेटअपमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत असे दिसते. (Latest Marathi News)

ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर यात 230mm फ्रंट डिस्क आणि मागील बाजूस 130mm ड्रम आहे. सेफ्टी फीचर्सद्दल बोलायचे झाल्यास, यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि साइड स्टँड इंजिन कट-ऑफ सारखी फीचर्स आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

Sanjay Raut News: संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Breaking: मोठी बातमी! आता पुणे सोलापूर मार्गावर होर्डिंग कोसळून अनेक गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

SCROLL FOR NEXT