Bapat Memes 
Image Story

Bapat Memes: विद्यानंद बापटांच्या मराठीची सोशल मीडियावर हवा; एकापेक्षा एक भन्नाट मिम्स व्हायरल

Bapat Memes: पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्या शुद्ध आणि संस्कृतप्रचुर मराठी वक्तव्यांची सोशल मीडियावर चर्चा आहे. डीजे, ढोल-ताशे आणि ध्वनी प्रदूषणाविरोधातील त्यांची भूमिका चर्चेत आली आहे.

Shruti Vilas Kadam
Bapat Memes

विद्यानंद बापट चर्चेत

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट सध्या त्यांच्या रोखठोक आणि प्रगल्भ मराठी भाषेतील वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

Bapat Memes

शुद्ध मराठीची सोशल मीडियावर चर्चा

बापट यांच्या बोलण्यातील संस्कृतप्रचुर आणि भारदस्त मराठीमुळे त्यांच्या मुलाखतीतील काही भाग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Bapat Memes

‘घटं भिन्द्यात्...’ वाक्य व्हायरल

त्यांच्या वक्तव्यामधील “घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्। येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्” हे संस्कृत वाक्य विशेष चर्चेचा विषय ठरले आहे.

Bapat Memes

मीम्स आणि रील्सचा धुमाकूळ

त्यांच्या बोलण्याच्या शैलीवर सोशल मीडिया यूजर्सकडून विविध मीम्स आणि रील्स तयार केले जात आहेत. त्यामुळे बापट यांचे वक्तव्य अधिक व्हायरल झाले आहे.

Bapat Memes

‘शाब्दिक गुन्हेगार’ अशी चर्चा

काही नेटिझन्सनी त्यांच्या अवघड आणि संस्कृतप्रचुर भाषाशैलीवर विनोदी प्रतिक्रिया देत त्यांना ‘शाब्दिक गुन्हेगार’ अशी उपाधी दिली आहे.

Bapat Memes

डीजे आणि ध्वनी प्रदूषणाविरोधात भूमिका

गणेशोत्सवादरम्यान होणारा डीजेचा आवाज, ढोल-ताशांचा सराव आणि वाढत्या ध्वनी प्रदूषणाविरोधात बापट यांनी ठाम भूमिका मांडली आहे.

Bapat Memes

रोखठोक वक्तव्यांमुळे लक्ष वेधले

सामाजिक प्रश्नांवर स्पष्टपणे मत मांडण्यासोबतच त्यांच्या वेगळ्या भाषाशैलीमुळे ते सध्या सोशल मीडिया आणि नेटकऱ्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत.

Maharashtra News Live Update: ऐन दुष्काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी; मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती

पुण्यात खळबळ! संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपनीवर CBI ची मोठी कारवाई; लाचखोरी अन् संवेदनशील माहिती उघड? बड्या अधिकाऱ्याला अटक

Ahilyanagar: नवरा-बायकोची आत्महत्या, खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं

Imran Khan: इम्रान खानला देश सोडून जाण्याची नोटीस का मिळाले? अभिनेता नक्की कोणत्या देशाचा नागरिक आहे?

Milk Tea Vs Black Tea: दुधाचा की कोरा, आरोग्यासाठी कोणता चहा बेस्ट?

SCROLL FOR NEXT