Climate Change saam tv
Image Story

Heatwave News: उकाड्याचा कहर! जगातील सर्वात उष्ण 20 शहरांमध्ये भारतातील शहरांचा समावेश, पाहा संपूर्ण लिस्ट

India Heatwave: देशभरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून भारतातील अनेक शहरांमध्ये तापमान ४७ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. हवामान विभागाने नागरिकांना दुपारी बाहेर न पडण्याचा आणि पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.

Surabhi Jayashree Jagdish
Rising Temperature

देशभरात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जगातील २० सर्वात उष्ण शहरांपैकी एक शहर वगळता बाकी सर्व भारतात आहेत. ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये तापमान ४७ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. हवामान विभागाने लोकांना दुपारी बाहेर न जाण्याचा आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिलाय.

Heatwave News

बलांगीर ते वाराणसीपर्यंत उष्णतेचा कहल

ओडिशातील बलांगीर आणि बिहारमधील सासाराम ही सर्वाधिक उष्ण शहरांपैकी आहेत. ज्या ठिकाणी तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि छत्तीसगडमधील बिलासपूरमध्येही तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने प्रचंड उष्णता होती.

IMD Alert

महासमुंद आणि मिर्झापूरसारख्या शहरांनाही फटका

आंध्र प्रदेशातील राजामहेंद्रवरम, छत्तीसगडमधील महासमुंद, तसंच उत्तर प्रदेशातील मोरादाबाद आणि मिर्झापूर याठिकाणीही तीव्र उष्णतेचा तडाखा बसला असून, तापमान ४७ अंशांपर्यंत पोहोचलंय. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडले होते. सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे वीज आणि पाण्याची मागणीही झपाट्याने वाढतेय.

Weather Update

बक्सर आणि प्रयागराजमध्ये उष्णतेमुळे नागरिकांना त्रास

बिहारमधील बक्सर, उत्तर प्रदेशातील जौनपूर आणि प्रयागराज, आणि तेलंगणातील खम्मम यांचाही जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये समावेश होतो. या सर्व शहरांमध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. या तीव्र उष्णतेमुळे सामान्य नागरिक आणि प्राणी दोघांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसून आलं.

Extreme Heat

सीतापूर आणि रायपूरमध्येही उष्णतेची लाट

उत्तर प्रदेशातील सीतापूर आणि पिलीभीत, छत्तीसगडमधील रायपूर आणि उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्येही उष्णतेची लाट दिसली. या शहरांमध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. दिवसा उष्णतेच्या लाटेमुळे रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

India Heatwave

दुर्ग आणि बरेलीमध्ये उष्णता वाढली

छत्तीसगडमधील दुर्ग, ओडिशामधील राउरकेला आणि उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर व बरेली यांचाही सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत समावेश आहे. या शहरांमधील तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. हवामान विभागाच्या मते, पुढील काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SHRAVAN : तुम्हाला माहित आहे का? श्रावणात नॉन - व्हेज का खात नाहीत?

Food Inflation : सर्वसामान्यांना झटका! अंडी-चिकनपासून लसूण-कांद्यापर्यंत सगळं महागलं, पाहा कोणत्या वस्तूंचे भाव भडकले

Maharashtra News Live Update: हर्णे बंदरात टायगर कोळंबीची बंपर आवक, मच्छीमारांची लगबग

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! ५८०० रुपयांनी सोनं महागलं, ७२ तासांत किती किमती वाढल्या?

Shiv Sena SC Case Live : ठाकरेंना धनुष्यबाण अन् 'शिवसेना' नाव परत मिळणार? सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी; शिंदे गटाचे टेन्शन वाढले

SCROLL FOR NEXT