पुण्याला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर गुरूवारी पूरस्थिती निर्माण झाली होती.
पूरामुळे पुण्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. पुण्यातील अनेक रहिवासी परिसरात पाणी शिरले होते.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकतानगर, विठ्ठल नगर आणि निंबजनगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते.
पूरामुळे अनेक नागरिकांच्या घरातील संसारउपयोगी साहित्य वाहून गेले. घराचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
पुण्यातील पूर ओसरला आहे. पूरानंतर पुण्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडेच घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.
पुणे महानगर पालिकेचे सफाई कर्मचारी पूरग्रस्त भागातील साफसफाईच्या कामामध्ये गुंतले आहेत.
पूरानंतर पुणे महानगर पालिकेकडून पूरग्रस्त भागांमध्ये पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे.
पुण्यातील अनेक रस्त्यांवर पूरासोबत वाहून आलेल्या झाडांच्या फांद्या आणि कचरा पाहायला मिळत आहे.
नदीपात्रामध्ये ढोल पथकांचा सराव सुरू असतो. पूरामुळे अनेकांची ढोल पाण्यामध्ये वाहून गेले तर अनेकांचे पत्रा शेड भुईसपाट झाले.
पूराच्या पाण्यासोबत अनेक वाहनं, संसारउपयोगी वस्तू वाहून गेल्या होत्या. त्या आता नदीकाठावर पाहायला मिळत आहेत.
अनेकांच्या घरामध्ये चिखल गाळ साचला आहे. ते बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. परिसरात सगळीकडे कचरा झाला आहे.
पूर ओसरल्यानंतर अनेकांच्या घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त झाले आहे. इलेक्ट्रीक वस्तू, टीव्ही, सोफा, फ्रीज सर्व खराब झाले आहे.
पुण्यातील ओकांरेश्वर मंदिर परिसरात मोठ्याप्रमाणात चिखल साचला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.