पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. उलवे येथे उभारण्यात आलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टपैकी एक असणार आहे. या विमानतळाच्या उभारणीमुळे नवी मुंबई आणि आसपासच्या भागाचा चेहरा आणि विकास होणार आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठी चालना मिळाली आहे. रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांपासून विमानतळ प्रकल्पामुळे या भागात जमिनींच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
सध्या उलवे आणि तळोजा परिसरात 1 BHK घरांची किंमत 40 ते 45 लाखांच्या पर्यंत पोहोचली आहे. तर 2 BHK घरे 80 लाख ते 90 लाख रुपयांच्या आत मिळू शकतात. खारघरमध्ये दर किंचित जास्त आहेत.
1 कोटी रुपयांच्या आत घर खरेदी हवे असल्यास नवी मुंबई परिसर हा एक उत्तम पर्याय बनला आहे. नवी मुंबई परिसरात शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि मेट्रोसारख्या सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने या भागाचा विकास अधिक गतीने होत आहे.
अटल सेतू, कोस्टल रोड आणि मेट्रो विस्तारामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यानंतर, पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर दरवर्षी 9 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असणार आहे.
नव्या प्रकल्पामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील भार कमी होण्यास मदत होईल आणि नवी मुंबईला विकासाची नवी दिशा मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.