Image Story

GST Reforms: कारचं स्वप्न होणार पूर्ण, ही मिनी कार तब्बल ३ लाखांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

Mini Cooper S Hatchback: जीएसटी दर घटल्यानंतर वाहन उद्योगात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक उत्पादकांनी गाड्यांच्या किमती कमी केल्या असून, देशातील लोकप्रिय छोटी कारही यामध्ये सामील झाली आहे.

Dhanshri Shintre

कूपर एस हॅचबॅक मॉडेल

मिनी इंडियाने नव्या गाड्यांच्या किमती जाहीर करताना मोठा बदल केला आहे. कूपर एस हॅचबॅक मॉडेल तब्बल ३ लाख रुपयांनी स्वस्त झाले असून, मात्र कंट्रीमन ई इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या किमती पूर्ववत ठेवण्यात आल्या आहेत.

बेस-स्पेक एसेंशियल ट्रिमची किंमत

नवीन दरांनुसार, बेस-स्पेक एसेंशियल ट्रिमची किंमत ४६.२० लाखांवरून घटून ४३.७० लाखांवर आली आहे. ज्यामुळे खरेदीदारांना तब्बल २.५ लाख रुपयांची थेट बचत होणार आहे.

क्लासिक ट्रिम किंमत

क्लासिक ट्रिमवर तब्बल २.७५ लाख रुपयांची घट झाली असून, या कारची किंमत ५१.९५ लाखांवरून कमी होऊन आता फक्त ४९.२० लाखांवर आली आहे.

फेव्हर्ड आणि जॉन कूपर वर्क्स ट्रिम

फेव्हर्ड आणि जॉन कूपर वर्क्स ट्रिमच्या किमतींमध्ये प्रत्येकी ३ लाख रुपयांची घट झाली आहे. आता फेव्हर्ड ट्रिम ५२ लाखांमध्ये, तर जॉन कूपर वर्क्स ५४.५० लाखांमध्ये उपलब्ध आहे.

मिनी कार्स किफायतशीर दरांत उपलब्ध

जीएसटी दर कमी झाल्याचा लाभ कंपनीने थेट ग्राहकांना देण्याचे ठरवले असून, त्यामुळे मिनी कार्स आता अधिक किफायतशीर दरांत उपलब्ध होतील.

मॉडेल्सच्या किमतींमध्येही सुधारणा

या निर्णयामुळे भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मिनीचे स्थान अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. लवकरच कंपनी इतर मॉडेल्सच्या किमतींमध्येही सुधारणा करू शकते, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे आणि पप्या शिंदे यांची एकत्रित चौकशी

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Egg : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर फोडावेत की नाही? जाणून घ्या त्वचारोगतज्ज्ञांचा हा खास सल्ला

Zodiac Signs : ऑक्टोबरमध्ये ग्रहांचा मोठा योग! या 3 राशींचे उजळणार भाग्य, नोकरीत होणार प्रगती

SCROLL FOR NEXT