Wayanad Landslide Photos Social Media
Image Story

Wayanad Landslide Photos: भूस्खलनामुळे अख्खी ४ गावं ढिगाऱ्याखाली दबली, ८० लोकांचा मृत्यू, अजूनही ४०० बेपत्ता

Kerala Landslie: वायनाडच्या ४ वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन झाले. यामुळे मुंडक्की, चूरालमाला, अट्टामाला आणि नूलपुझा ही गावं प्रभावित झाले आहेत.

Priya More
Wayanad Landslide

केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री भूस्खलनाची मोठी घटना घडली.

Wayanad Landslide

वायनाडच्या ४ वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन झाले. यामुळे मुंडक्की, चूरालमाला, अट्टामाला आणि नूलपुझा ही गावं प्रभावित झाले आहेत.

Wayanad Landslide

या घटनेमध्ये आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला तर ११६ जण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णांलयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Wayanad Landslide

या भूस्खलनामध्ये ४०० लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. घटनास्थळावर युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.

Wayanad Landslide

रेस्क्यूसाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम बचावकार्यामध्ये गुंतली आहे. युद्धपातळीवर सुरू आहेत.

Wayanad Landslide

कन्नूरवरून लष्कराचे २२५ जवान वायनाडला पाठवण्यात आले आहे. यामध्ये मेडिकल टीमचा देखील सहभाग आहे.

Wayanad Landslide

एअरफोर्सचे २ हेलिकॉप्टर रेस्क्यू ऑपरेशनसाठी आले होते. पण मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे ते परत पाठवण्यात आले.

Wayanad Landslide

५ वर्षांपूर्वी मुसळधार पावसामुळे या चार गावांमध्ये भूस्खलन झाले होते. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झालेले तर ५ जण बेपत्ता झाले होते.

Wayanad Landslide

सोमवारी रात्री झालेल्या भूस्खलनात वायनाडमधील मुंडक्कई गाव सर्वात जास्त प्रभावित झाले आहे. याठिकाणी २५० जण अडकले आहेत.

Wayanad Landslide

मुंडक्कई गावामध्ये ६५ कुटुंब राहत होते. तर जवळच असणाऱ्या एका टी एस्टेटमधील ३५ कर्मचारी बेपत्ता आहेत.

Wayanad Landslide

हवामान खात्याने वायनाडव्यतिरिक्त कोझिकोड, मल्लपुरम आणि कासरगोडमध्ये पावासाचा रेड अलर्ट जारी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT