Omar Abdullah Marries Journalist Nidhi Razdan At 56 | Who Is She? saam tv
Image Story

CM Omar Abdullah Wedding: 56 व्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; कोण आहे CMची पत्नी?

J&K Chief Minister Marriage With Journalist Nidhi Razdan: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ज्येष्ठ पत्रकार निधी राजदान यांच्याशी दुसरा विवाह केला. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी नव्या प्रवासाची सुरुवात झाल्याची माहिती दिली.

Bharat Jadhav
Omar Abdullah Marries Journalist Nidhi Razdan At 56 | Who Is She?

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दुसऱ्यांदा लगीनगाठ बांधलीय. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याची माहिती दिलीय.

Omar Abdullah Marries Journalist Nidhi Razdan At 56 | Who Is She?

ज्येष्ठ पत्रकार निधी राजदान यांच्याशी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी विवाह केला आहे. इन्स्टाग्रामवर निधी राजदान यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत ओमर अब्दुल्ला यांनी लिहिले की, "काल एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली." त्यांनी या पोस्टमध्ये निधी राजदान यांना टॅगही केलंय.

Omar Abdullah Marries Journalist Nidhi Razdan At 56 | Who Is She?

या घोषणेसह त्यांच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे. तीन महिन्याआधीच मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांचा घटस्फोट झाला होता.

Omar Abdullah Marries Journalist Nidhi Razdan At 56 | Who Is She?

३१ जुलै २०२६ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने उमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. दोन्ही पक्षांनी न्यायालयाला कळवले की, त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा आणि सर्व प्रलंबित वाद मिटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेले खटले मागे घेण्याचेही मान्य केले.

Omar Abdullah Marries Journalist Nidhi Razdan At 56 | Who Is She?

जेव्हा उमर अब्दुल्ला यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला आव्हान दिले, ज्याद्वारे त्यांना घटस्फोट नाकारण्यात आला होता, तेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांनी राज्यघटनेच्या कलम १४२ अंतर्गत परस्पर संमतीने घटस्फोट मिळवण्यासाठी एक संयुक्त अर्ज दाखल केला होता. वरिष्ठ वकील कपिल सिबल यांनी दोन्ही पक्षांच्या वतीने न्यायालयाला सांगितले की, त्यांनी आपापले मतभेद मिटवण्याचे मान्य केलंय.

Omar Abdullah Marries Journalist Nidhi Razdan At 56 | Who Is She?

पहिली पत्नी कोण?

उमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांचा विवाह १९९४ मध्ये झाला. त्यांची भेट दिल्लीतील ओबेरॉय हॉटेलमध्ये काम करत असताना झाली होती. त्यांना जाहिर आणि झमीर नावाचे दोन मुलं आहेत. २००९ मध्ये उमर अब्दुला आणि पायल अब्दुला विभक्त झाले होते.

कोण आहे दुसरी पत्नी?

निधी राजदान या एक सुप्रसिद्ध न्यूज अँकर आहेत. त्या दीर्घकाळ एनडीटीव्ही (NDTV) मध्ये कार्यरत होत्या. जिथे त्यांनी अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले. एनडीटीव्हीची मालकी प्रणय रॉय यांच्याकडून अदानी समूहाकडे हस्तांतरित झाली, तेव्हा त्यांनी वृत्तवाहिनी सोडली आणि शैक्षणिक क्षेत्र तसेच डिजिटल माध्यमांकडे आपला मोर्चा वळवला.

Communication Department चा संचालिका

त्यांना राजकारण, परराष्ट्र व्यवहार आणि चालू घडामोडींवर उत्तम पकड असलेली पत्रकार मानले जातं. दिल्लीची रहिवासी असलेली ती इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांत पारंगत आहेत. सध्या ती IILM इन्स्टिट्यूटमध्ये Communication Department च्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge: स्वस्तात मस्त! Jio चा भन्नाट रिचार्ज, फक्त १४७ रुपयांत मिळवा भरपूर फायदे

पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! दिवाळीनंतर दोन दिवस पाणीकपात?

15 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासनात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

NAFSCOB च्या संचालकपदी ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर बिनविरोध

Maharashtra News Live Update: भीमाशंकर वृक्षतोड प्रकरणावर वनमंत्री गणेश नाईक यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रकरणाची तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT