भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मलिकेत भारतीय संघाने ४-१ ने विजय मिळवला. ही मालिका झाल्यानंतर आयसीसीकडून टी-२० रँकिंगची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी आहे.
सूर्यकुमार यादव या यादीत दुसऱ्या स्थानी असला तरीदेखील इंग्लंडचा स्टार फलंदाज फिल सॉल्ट त्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या यशस्वी जयस्वालला या रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. त्याने लांब उडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रेविस हेड ८४४ रेटींग पॉईँट्ससह या यादीत अव्वल स्थानी आहे. गेल्या काही आठवड्यांपासून त्याने आपली रँकिंग आणखी मजबूत केली आहे.
सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानी कायम आहे. त्याची रेटींग ७९७ इतकी आहे. त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. मात्र तो आता श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसून येणार आहे.
भारताचा युवा स्टार यशस्वी जयस्वाल ७४३ रेटींग पॉईंट्ससह सहाव्या स्थानी आहे. त्याने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे.
तर इतर फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम ७५५ रेटींग पॉईंट्ससह चौथ्या स्थानी आहे.
तर पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान ७४६ रेटींग पॉईंट्ससह या यादीत पाचव्या स्थानी आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.