अभिनेत्री सारा अली खानला काही वेगळ्या प्रसिद्धीची गरज नाही. तिने आपल्या साध्या आणि सिंपल स्वभावाच्या जोरावर ओळख निर्माण केली आहे.
सारा अली खानचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ रोजी झाला असून आज ती २९ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे.
सारा सैफ अली आणि अमृता सिंगची लेक आहे.
अभिनेत्री वयाच्या २९ व्या वर्षीच कोट्यवधींची मालकीण आहे. तिने २०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'केदारनाथ' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले.
साराने तिच्या फिल्मी करियरमध्ये ९ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी तिचे ५ चित्रपट हिट ठरले आहेत. यामध्ये ‘केदारनाथ’, ‘सिंबा’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘मर्डर मुबारक’, ‘ऐ वतन मेरे वतन’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सारा अली खान तब्बल ४१ कोटींची मालकीण आहे. ती एका चित्रपटासाठी ५ ते ७ कोटी इतके मानधन स्वीकरते.
सारा फक्त चित्रपटातूनच नाही तर, ब्रँड अँडोर्समेंट आणि जाहीरातींच्या माध्यमातूनही चांगली कमाई करते.
साराचं स्वत:च्या मालकीचं मुंबईत घर असून तिच्या घराची किंमत १.५ कोटी इतके आहे.
साराकडे अनेक महागड्या कार्स आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.