नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदाने नुकतीच विविध महत्त्वाच्या पदांसाठी भरती सुरु केली आहे. तुम्हाला बॅंकेमध्ये मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करता येणार आहे.
मुख्य व्यवस्थापक पदासाठी दोन जागा उपलब्ध असणार आहेत. या पदासाठी उमेदवारांचे वय ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे लागेल. यासाठी अर्थशास्त्र, वाणिज्य किंवा संबंधित शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
सीए, एमबीए किंवा आयआयएम प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना इथे प्राधान्य दिले जाईल. जर तुम्हाला बँकिंग किंवा ब्रोकरेज क्षेत्रात ८ वर्षांचा अनुभव आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स किंवा संशोधनात २ वर्षांचा अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिले जाईल.
व्यवस्थापक पदासाठी ट्रेड फायनान्स ऑपरेशन्समध्ये १४ जागा असून उमेदवारांचे वय २४ ते ३४ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. शिवाय पदवीधर उमेदवार इथे अर्ज करू शकतात. मात्र IIBF FOREX, CDCS किंवा CITF प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळेल.
फॉरेक्स अॅक्विझिशन अँड रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी ३७ जागा असून उमेदवारांचे वय २६ ते ३६ वर्षांच्या दरम्यान असावे आणि पदवी अनिवार्य आहे. वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी ५ जागा असून उमेदवारांचे वय २९ ते ३९ वर्षांच्या दरम्यान असावे. इच्छुक उमेदवार ९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतील.
अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन Current Opportunities लिंकवर क्लिक करणे आवश्यक आहे आणि ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यावर पावती डाउनलोड करावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.