म्यानमारमध्ये ७.७ च्या तीव्रतेने मोठा भूंकप आला. हा भूकंपाची तीव्रता येवढी जास्त होती की, याचे हादरे थायलंड, चीन, भारत आणि बांग्लादेशपर्यंत जाणवले.
भूकंपाचे केंद्र म्यानमारमधील सागाईंग शहर होता. आणि त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.७ इतकी होती.
या भूकंपाची थरकाप उडवणारी दृश्ये आता समोर येत आहेत. भूंकपामुळे लोक सैरावैरा पळताना दिसत आहेत.
भूकंपामुळे बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक बहुमजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ८० हून अधिक कामगार अडकल्याची माहिती आहे
भूकंपामुळे म्यानमारची राजधानी नायपिदावमधील रस्ते खचले, इमारतींचे नुकसान झाले मंदिरे आणि घरे उद्ध्वस्त झाली. म्यानमारमध्ये भूंकपामुळे २० जणांचा मृत्यू झाला तर, ३०० जण जखमी आहेत.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या जीएफझेड जिओलॉजिकल सेंटरने सांगितले की,भूकंप 10 किलोमीटर खोल होता.
मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे थायलंडचे पंतप्रधान पिथोंगटार्न शिनावात्रा यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.