दिवाळी आता फक्त काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वत्र रोशनाई आणि आनंद पाहायला मिळत आहे.
दिवाळी म्हटलं की शॉपिंग आली. मात्र कधीही दिवाळीची शॉपिंग करताना काही गोष्टी खरेदी करू नये. यामुळे आर्थिक परिस्थिती खराब होऊ शकते.
दिवाळीत चुकूनही काळ्या कपड्यांची शॉपिंग करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार, काळे कपडे घातल्यास घरात नकारात्मकता येते.
दिवाळीत कमी किंमतीत तांब्या-पितळ्याची भांडी मिळतात म्हणून ती घरी घेऊन येऊ नये. कारण अनेक वेळा कमी किंमतीमध्ये मिळणारी भांडी वापरलेली असतात.
दिवाळीत तांब्या-पितळ्याची भांडी घ्यायची असल्यास एका चांगल्या भांड्यांच्या दुकानात जाऊन खरेदी करावी.
ज्योतिषशास्त्रानुसार, दुसऱ्यांनी वापरलेली भांडी आपण वापरल्यास दुसऱ्याचे दारिद्र्य आपल्या घरात येते आणि पैशांची समस्या उद्भवते.
दिवाळी हा प्रेमाचा आणि आनंदाचा सण आहे. त्यामुळे धारदार वस्तूंची खरेदी करू नये. यामुळे लक्ष्मीची कृपा राहत नाही.
दिवाळीत लक्ष्मीची पूजा करताना घरातीलच वस्तू पूजेत मांडाव्यात.
दिवाळीची शॉपिंग करताना या गोष्टींची काळजी घेतल्यास, घरात पैशांची भरभराट होते. तसेच कर्जही दूर होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.