मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात मोठा रिॲलिटी शो 'बिग बॉस मराठी ५'मध्ये एकापेक्षा एक अवलिया सदस्य सहभागी झाले आहेत.
वेगवेगळ्या छटा असलेले हे सदस्य यंदाचा सीझन चांगलाच गाजवणार आहेत. जाणून घ्या १६ स्पर्धकांबद्दल...
मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ९०च्या दशकातील महानायिका वर्षा उसगांवकर या 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणाऱ्या पहिल्या सदस्य ठरल्या आहेत. स्वप्नसुंदरी, महिलांची लाडकी स्टाईल आयकॉन आणि ड्रीमगर्ल अशी वर्षा उसगांवकर यांची ओळख आहे.
कलर्स मराठीच्या 'रमा राघव' या मालिकेत निखिल दामले मुख्य भूमिकेत होता. राघवचं पात्र त्याने साकारलं होतं. आजवर आपल्या दर्जेदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे.
कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकर एक लोकप्रिय इन्फ्लुएंसर आहे. मालवणचा चेडू अंकिता प्रभू वालावलकर आता बिग बॉस मराठीच्या घरात कोकणी हिसका दाखवायला सज्ज आहे.
हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळेने मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा काम केलं आहे. वेगवेगळी कॅरेक्टर्स करणारा हा माणूस स्वतःच एक कॅरेक्टर आहे.
योगिता चव्हाण 'कलर्स मराठी'वरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेत नायिका म्हणून झळकली. सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणाऱ्या तिच्या अंतरा या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली.
'कलर्स मराठी'वरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत जान्हवी किल्लेकरने सानियाची भूमिका साकारली. सर्वांना पुरून उरणारी आणि आपल्या डोळ्यांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अशी ही जान्हवी किल्लेकर आहे.
अभिजीत सावंतने आपल्या आवाजाने संपूर्ण भारताला वेड लावलं. टेलिव्हिजनचा लोकप्रिय सिंगिंग स्टार म्हणून तो ओळखला जातो.
गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री झाली आहे. आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा हा एक पुढारी आहे.
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्यांदाच एका 'परदेसी गर्ल'ची एन्ट्री झाली आहे. इरिना रूडाकोवा बऱ्याच वर्षांपासून भारतात राहतेय. इरिना सॉलिड परफॉर्मर, कमालीची डान्सर आणि अभिनेत्री आहे.
आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी डोंबिवलीची मराठी मुलगी आता हिंदी बिग बॉसमध्ये अनेकांना टक्कर देत टॉप थ्री मध्ये पोहोचली होती. बोल्ड, बिनधास्त आणि सुंदर असलेल्या निक्कीने आयुष्यातील तिचे नियम स्वत:च ठरवले आहेत.
महाराष्ट्राच्या मातीतला बारामतीचा रांगडा गडी म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण. लढवैया, बिनधास्त आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या वैभवने 'मन झालं बाजींद' मालिकेतून प्रेक्षकांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.
रिॲलिटी शोचा स्टार, स्प्लिट्सविलाची जान म्हणजेच अरबाज पटेल. अरबाजने आपल्या स्टाईल आणि स्वॅगने अनेकांना घायाळ केलं आहे. अरबाजचे अनेक म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
रॅपची राणी म्हणजे आर्या जाधवची स्टाईलच हटके आहे. शब्दांवरची तिची पकड तिच्या प्रत्येक रॅपमध्ये दिसून येते. रॉकस्टार म्हणून सोशल मीडियावर ती चांगलीच लोकप्रिय आहे.
गावरान भाषा जपणारा कोल्हापूरचा बिजनेसमन म्हणजेच धनंजय पोवार. उद्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा कोल्हापुरी गडी आहे. घरी आई आणि बायकोच्या आदेशाबाहेर न जाणारे धनंजय पोवार आता बिग बॉसचे आदेश देताना दिसणार आहेत.
किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांचे भाषण ऐकायला व्यासपीठावर लाखोंची गर्दी होते. आळंदी, पुणे, मुंबई, रायगड येथील मठांचा तो प्रसिद्ध मठाधिपती आहे.
टिक टॉकचा पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गुलीगत सूरज चव्हाण. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घर गाजवायला सज्ज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.