Skin Care SAAM TV
Image Story

Skin Care : चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याच्या नादात चुकूनही त्वचेवर डायरेक्ट लावू नका 'हे' पदार्थ, नाहीतर...

Skin Care Tips : चेहऱ्यावर कोणते पदार्थ लावू नये जाणून घ्या.

Shreya Maskar
The beauty of the face

चेहऱ्याचे सौंदर्य

अनेक महिला चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती उपाय करतात. पण ते करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

skin care

त्वचेची काळजी

असे काही पदार्थ आहेत जे त्वचेसाठी चांगले असतात. पण ते पदार्थ चेहऱ्यावर थेट लावल्यास त्वचा खराब होऊ शकते.

Tomato juice

टोमॅटोचा रस

टोमॅटोचा रस कधीही नुसता चेहऱ्याला लावू नये कारण त्यातील अॅसिड त्वचेचे पीएच खराब करते. त्यामुळे त्वचा कोरडी होते.

honey

मधाचा वापर

चेहऱ्यावर टोमॅटोचा रस लावायचा असल्यास त्यामध्ये मध घालून मगच चेहऱ्यावर लावा.

sugar

साखर

बऱ्याच महिला चेहरा स्क्रब करताना साखरेचा वापर करतात. जे चुकीचे आहे. कारण साखरेचे कण आपल्या त्वचेला स्क्रॅच करून चेहऱ्याचे नुकसान करतात.

Baking soda

बेकिंग सोडा

चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा बेकिंग सोडा फेसपॅकमध्ये मिसळतो. पण यामुळे चेहऱ्याचे आरोग्य धोक्यात येते.

Dry skin

कोरडी त्वचा

बेकिंग सोड्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल कमी होऊन त्वचा कोरडी बनते.

Toothpaste

टूथपेस्ट

पिंपल्स घालवण्यासाठी अनेकजण टूथपेस्टचा वापर करतात. पण असे केल्याने त्वचेची जळजळ होऊ शकते.

Lemon juice

लिंबाचा रस

लिंबाचा रस देखील नुसता चेहऱ्याला लावू नये कारण यामुळे त्वचेची पीएच पातळी बिघडते आणि चेहरा अधिक संवेदनशील होतो.

Mustard oil

मोहरी तेल

मोहरीचे तेल चुकूनही चेहऱ्यावर लावू नये. यामुळे चेहरा काळवंडतो. लाल चट्टे आणि पुरळ येते.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT