तुम्हाला आता लग्नसमारंभात किंवा पार्टीमध्ये , रोजच्या दैनंदिन आयुष्यात सुंदर आणि सगळ्यांपेक्षा हटके लुक पाहिजे असेल तर तुम्ही मोत्याचे नेकलेस वापरू शकता.
सध्या बाजारात पर्ल नेकलेसची सगळ्यात जास्त घरेदी होत आहे. त्यामध्ये मोत्याचे विविध पॅटर्नचे मॉर्डन टच देणारे नेकलेस तुम्ही वापरू शकता.
तुम्ही ट्रेडिशनसोबत किंवा वेस्टर्न आउटफीट परिधान करत असाल तर मल्टी-लेयर मधला चोकर डिझाइनचा नेकलेस तुम्ही परिधान करू शकता.
तुम्हाला रॉयल लुक पाहिजे असेल तर तुम्ही पर्ल नेकलेस डिझाइन परिधान करू शकता.
लेटेस्ट डिझाइन पाहणार असाल तर तुम्ही मोती आणि गोल्ड सिल्वर मिक्स असलेला नेकलेस परिधान करू शकता.
तुम्ही मोत्याचा नेकलेस पांढऱ्या, गुलाबी, ग्रे, ब्लॅक, पेस्टल अशा विविध शेड्समध्ये खरेदी करू शकता.
तुम्हाला गाउनवर किंवा वनपीसवर सुंदर असा नेकलेस हवा असेल तर तुम्ही गोल गळ्याचा आणि एका कडेला फुल किंवा विविध डिझाइन असणारा नेकलेस परिधान करू शकता.
तुम्हाला ऑफीसमध्ये तुमच्या साडीवर मॉर्डन आणि हटके लुक हवा असेल तर तुम्ही ठळक मोत्याचे नेकलेस आणि कानातले परिधान करा.
तुम्हाला जर ठळक दागिने आवडत नसतील तर तुम्ही नाजूक डिझाइनचे नेकलेस आणि त्यात मोती असा नेकलेस परिधान करू शकता.