Today's lucky zodiac signs saam tv
राशिभविष्य

Lucky zodiac signs: आज कोणाला मिळणार शुभवार्ता? चंद्र तूळ राशीत असल्याने 4 राशींना मिळणार मोठा फायदा

Good news today for these zodiac signs: मन आणि सौभाग्याचा कारक असलेला चंद्र ग्रह कला, सौंदर्य आणि प्रेमाचा कारक असलेल्या शुक्राच्या राशीत, म्हणजेच तूळ राशीत प्रवेश करत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज 19 नोव्हेंबर 2025 आहे. आजपासून हेमंत ऋतूची चाहूल अधिक जाणवताना दिसतेय. आजचा दिवस धार्मिक दृष्टीने त्याचप्रमाणे ग्रहस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. चंद्र तूळ राशीत भ्रमण करत असल्याने काही राशींना याचा विशेष लाभ होणार आहे.

आजचं पंचांग तपशील

  • तिथि: कृष्ण चतुर्दशी

  • नक्षत्र: विशाखा

  • करण: शकुनि

  • पक्ष: कृष्ण पक्ष

  • योग: सौभाग्य (सकाळी 09:01:10 पर्यंत)

  • वार: बुधवार

  • सूर्योदय: 06:38:40 AM

  • सूर्यास्त: 05:26:24 PM

  • चंद्र उदय: 05:42:30 AM

  • चंद्रास्त: 04:35:42 PM

  • चंद्र राशी: तुला

  • ऋतु: हेमंत

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): कार्तिक

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काल

राहुकाल: 12:02:32 PM ते 01:23:30 PM

यमघंट काल: 07:59:38 AM ते 09:20:36 AM

गुलिकाल: 10:41:34 AM ते 12:02:32 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त: 11:41:00 AM ते 12:23:00 PM

आजचा दिवस या चार राशींसाठी ठरणार लकी

तूळ रास

चंद्र तुमच्या राशीत असल्याने संपूर्ण दिवस चांगला असणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

धनु राशी

व्यावसायिक जीवनात प्रगतीची चिन्हं दिसून येणार आहेत. यावेळी तुम्हाला नवी संधी मिळू शकणार आहे. घरगुती कामात समाधान मिळण्याची शक्यता आहे. दुपारनंतर चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी

आज तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित फळ मिळणार आहे. नोकरीत वरिष्ठांची मदत मिळणार आहे. नवी योजना आखण्यासाठी योग्य दिवस आहे. मानसिक शांतता आणि आरोग्य दोन्ही चांगलं राहणार आहे.

मेष राशी

आज तुमचा उत्साह वाढलेला असणार आहे. व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय फलदायी ठरणार आहेत. संबंध सुधारतील आणि मित्रांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती पगार दिला जात होता?

Mix Vegetable Cutlet: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मिक्स भाज्यांचे क्रिस्पी कटलेट; ५ मिनिटात होईल तयार

Viral Video: कष्टाची ताकद काय असते? ६० किलो वजन उचलणाऱ्या शेतकऱ्याच्या वाघीणीचा व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Mayor List : तुमच्या शहराचा कारभारी कोण? मुंबई, ठाण्यापासून सोलापूर ते नागपूरपर्यंत २९ महापालिकांच्या महापौर-उपमहापौरांची संपूर्ण यादी

Rahul Gandhi: हे ट्रेड डील नाही तर होलसेल सरेंडर; राहुल गांधींच्या विधानाने लोकसभेत गदारोळ

SCROLL FOR NEXT