horoscope in marathi  Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : तब्येतीची काळजी घ्या, हितशत्रूंमध्ये वाढ होईल; ५ राशींच्या लोकांना सांभाळून पावले उचलावी लागणार

Wednesday Horoscope In Marathi : काही राशींच्या लोकांना तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तर काहींच्या हितशत्रूंमध्ये वाढ होईल

Anjali Potdar

आजचे पंचांग

बुधवार,२ जुलै २०२५,आषाढ शुक्लपक्ष,

बुधाष्टमी.

तिथी-सप्तमी ११|५९

रास-कन्या

नक्षत्र-उत्तरा

योग-वरीयान

करण- वणिज

दिनविशेष-१२ प.चांगला

मेष - उष्णतेचे विकार होतील. थोडी तब्येतीची काळजी घेणे आज गरजेचं आहे. हितशत्रूंमध्ये वाढ होईल. मानसिकता जपावी लागेल.

वृषभ - मनोरंजनात्मक कार्यामध्ये विशेष रस वाढेल. क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. संततीकडून आनंदाच्या वार्ता आल्यामुळे दिवसाला सुखाचे उधाण येईल. लक्ष्मी उपासना करावी.

मिथुन - वाहन सौख्य, गृह सौख्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. मनात ठरवलेल्या योजना तसेच पद्धतीने पार पडतील. पुस्तक खरेदी, वाचनामध्ये आनंद शोधाल.

कर्क - भावंडासौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. काहीतरी वेगळे आयुष्यात घडते आहे याची जाणीव होईल. स्वप्नांना नवे पंख फुटतील. जवळचे प्रवास घडतील. दिवस संमिश्र आहे.

सिंह - जोडीदाराच्या तब्येतीची विशेष काळजी घेणे आज गरजेचे आहे. ताण, त्रास येऊ नये त्यासाठी कुटुंबीयांची मदत आज मोलाची ठरेल. धनयोगासाठी, गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.

कन्या - श्रीराम कृपेने छान चालू आहे अशी भावना आज येईल. सकारात्मक लहरींनी भारलेला आजचा दिवस असेल. नवीन ऊर्जा घेऊन काम कराल. कामे सुखावह होतील.

तूळ - करियर मध्ये महत्त्वाचा टप्पा पार पाडाल. मनोबल थोडे कमी राहील. मोठ्या प्रवासाचे योग आणि नियोजन याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. पैशाचे व्यवहार जपून करावेत.

वृश्चिक - अनेक लाभ घेऊन आलेला आजचा दिवस आहे. सून, जावई जवळचे परिचित, मित्र मैत्रिणी, स्नेहीजन यांच्याबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. गुंतवणूक फायद्याची ठरेल.

धनु - समाजकारणामध्ये विशेष यश मिळेल. नियोजित कामे योग्य वेळी घडतील. करिअरला नवीन दिशा सापडेल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन आपल्या क्षेत्रात मिळाल्यामुळे नवा हुरूप येईल.

मकर - शिव उपासना करावी. लांबच्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. दानधर्म अध्यात्म यामध्ये दिवस व्यस्त राहील. भाग्यकारक घटना घडतील.

कुंभ - जेवढे काम कराल तेवढेच कमवाल. पण कमवताना काळा पैसा नाही ना याचा चार वेळा विचार करा. संकटे आली तरी एकट्यानेच यावर मात करावी लागेल. त्यामुळे मोठे धाडस आज नकोच.

मीन - जोडीदाराबरोबर आनंदी क्षण उपभोगाल. कोर्ट कचेरीच्या गोष्टी असतील तर त्यामध्ये आज यश मिळेल. नव्याने व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन संकल्पना राबवायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT