Wednesday Horoscope in Marathi Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : शांतपणे आपला पल्ला गाठाल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात बुधवारी चांगल्या गोष्टी घडणार

Wednesday Horoscope in marathi : काही राशींचे लोक शांतपणे आपला पल्ला गाठतील. तर काहींच्या आयुष्यात बुधवारी चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

पंचांग

बुधवार ,२४ डिसेंबर २०२५,पौष शुक्लपक्ष.

तिथी-चतुर्थी १३|१२

रास-मकर १९|४६ नं. कुंभ

नक्षत्र-धनिष्ठा(अहोरात्र)

योग-हर्षण

करण-विष्टीकरण

दिनविशेष- १३ नं. चांगला

मेष - सामाजिक क्षेत्रात चांगली घोडदौड होईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन सुसंधी लाभेल. प्रसिद्धी मिळेल. मान सन्मान आणि धावपळीने गजबजलेला आजचा दिवस आहे.

वृषभ - मनात ठरवलेल्या गोष्टी होतील. मन आनंदी आणि आशावादी राहील. एखादी महत्त्वाची वार्ता कानावर येईल. दिवस उत्तम आहे. लक्ष्मी उपासना करावी. नातवंडांच्या सुखात दंग असाल.

मिथुन - आपल्या वर्तनाने काही अडचणी आज ओढवून घ्याल. त्यामुळे कोणाशीही विनाकारण वाद विवाद आज टाळावेत. दैनंदिन कामे सुद्धा रखडण्याची शक्यता आहे. म्हणून महत्त्वाची कामे उद्यावर ढकलणे जास्त योग्य राहील.

कर्क - कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. व्यवसायामध्ये नवीन तंत्र मंत्र अमलात आणू शकाल.जे ठरवाल ते होईल असा दिवस आहे. म्हणून नियोजनाला विशेष महत्त्व द्या.

सिंह - आरोग्याच्या तक्रारीने त्रस्त असाल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करून घेणे जास्त योग्य ठरेल. गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो आहे .

कन्या - शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. संततीचे प्रश्नही मार्गी लागणार आहेत. विष्णू उपासना यामुळे आपल्या मनोकामना आज पूर्ण होतील. लक्ष्मी प्राप्तीचे योग आहेत.

तूळ - राहत्या जागेचे प्रश्न असतील तर त्यावर आज काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न कराल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरणार आहेत. प्रयत्नांती परमेश्वर असा दिवस आहे. कौटुंबिक साथ चांगली मिळेल.

वृश्चिक - जिद्दीने कार्यरत राहणार आहात. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील दहा जणांची कामे एकटे सुद्धा पेलू शकाल. इतके मनोबल चांगले असेल. शांतपणे आपला पल्ला गाठाल.

धनु - कौटुंबिक जीवनात चांगले बदल घडतील. सुसंवाद साधू शकाल. व्यवसायामध्ये प्रयत्नांनी यश मिळेल. कशाला महत्त्व द्यायचे आहे हे ठरवून आज कामे करणे बरे ठरेल.

मकर - मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. हाती घेतलेल्या कामांमध्ये निश्चितच तुम्हाला आज सुयश लाभणार आहे.शांतपणे आणि गंभीर विचार करत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी घेऊन आलेला आहे.

कुंभ - आरोग्याच्या तक्रारीकडे विशेष लक्ष द्यायला लागेल. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान कमी असेल. खर्च अफाट होईल. अध्यात्मिक विषयाकडे विशेष लक्ष द्यावे .

मीन - मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्याने पुढे जाण्याचे योग आहेत. दिवस चांगल्या काही घटना घेऊन आलेला आहे. आपण लाभार्थी असाल .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

शिक्षक भरती घोटाळा: आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT