Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Horoscope: प्रेम,नोकरीबाबत येईल आनंदाची बातमी; जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Wednesday Horoscope in marathi: आज प्रदोषाचा दिवस अजून आजचा दिवस अनेकांसाठी लाभकारी असणार आहे. काही राशींच्या जातकांना त्यांच्या व्यवसायात प्रगती होईल. काहींना नोकरीबाबत आनंदाची बातमी आज मिळण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

बुधवार,१७ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष कृष्णपक्ष,प्रदोष.

तिथी-त्रयोदशी २६|३३

रास-तुला १०|२६ नं. वृश्चिक

नक्षत्र-विशाखा

योग-सुकर्मा

करण-गरज

दिनविशेष-त्रयोदशी वर्ज्य

मेष

कारण नसताना मागे लागलेल्या काही गोष्टी आज सुकर होतील. जसे की कोर्ट- कचेरीची कामे, आज आपल्या बाजूने निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात घोडदौड चांगली राहील .

वृषभ

नोकर चाकारांचे सुख मिळेल. कलाक्षेत्रामध्ये विशेष प्रगती होईल. नवीन नोकरीच्या शोधामध्ये असणारे लोकांना आजचा दिवस सुदिन आहे असे समजायला हरकत नाही. गुप्त शत्रु मात्र ओळखून सावध पावले टाका.

मिथुन

आज प्रदोषाचा दिवस आहे. उपासनेला अतिशय उत्तम. शिव, विष्णू उपासना आज करणं आपल्या राशीला फलदायी आहे. उपासना मार्गातून चांगली फळे मिळतील. प्रेम प्रणयाला बहर येईल.

कर्क

शेतीवाडी मधून फायदा संभवतो आहे. जमिनीचे क्रय विक्रय काय करणार असाल तर आजचा दिवस आपल्या राशीसाठी योग्य राहील. दूध-दुभते जनावरांपासून पासून फायदा आहे. एकूणच अर्थार्जन चांगले होईल.

सिंह

शेजारील व्यक्तींवर आपला प्रभाव राहील. महत्त्वाची कामे आज सहज पार पडतील. जुने अडखळलेले पत्रव्यवहार मार्गी लागणार आहेत. दिवसाची सुरुवात चांगली आणि शेवटही चांगलाच होणार आहे याची खात्री असावी.

कन्या

मनाने घेतलेले निर्णय योग्य ठरतील. पैशाची गुंतवणूक वारसा हक्कापासून मिळणारा पैसा यासाठी दिवस अनुकूल आहे. घरातील व्यक्तींचे योग्य सहकार्य मिळेल. हिशोब नीट ठेवल्यास स्वास्थ लाभेल.

तूळ

सर्व गोष्टी प्रमाणातच केलेल्या बऱ्या. आज कोणत्याही गोष्टीचा अट्टाहास नको. स्वतःला आनंद वाटेल अशा गोष्टी करा.नव्याने खरेदी होईल. व्यक्तिमत्वाला सुंदर अशी आभा लाभेल.

वृश्चिक

प्रेमामध्ये अपयश संभवते आहे. मोठे व्यवहार किंवा मोठे खर्च होतील. मुख्यत्वे तब्येतीसाठी काहीतरी मोठे खर्च होतील. हॉस्पिटलायझेशन, बंधनयोग अशा गोष्टींमध्ये व्यय दिसतो आहे.

धनु

सून जावया यांच्या स्नेहामुळे भारावून जाल.जवळच्या लोकांबरोबर स्नेहभोजनाचे योग आहेत. नव्याने काही परिचय होतील. कामांमध्ये सृजनशीलता वाढेल.

मकर

प्रवासामधून फायदा आहे. जुन्या गोष्टी सोडून नव्याने कार्यरत राहावे लागेल. समाजामध्ये मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभण्याचा आजचा दिवस आहे.

कुंभ

आजचा प्रदोषाचा दिवस आपल्याला सुवर्ता घेऊन आलेला आहे. शिव उपासना उत्तम ठरेल. तीर्थक्षेत्रि भेटी होतील. यश सहज दारी येईल. नातवंड सौख्य चांगले आहे.

मीन

जेवढे स्वतःवर विश्वास ठेवाल. तितके पुढे जाल. आज कोणाच्या सहकार्याची अपेक्षा करणे योग्य राहणार नाही. जोडीदारापासून मात्र धन लाभाची शक्यता आहे. दिवस संमिश्र राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 31 व्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर भलंमोठं मधमाश्यांचं पोळं; रहिवाश्यांनी केला व्हिडीओ शेअर

मनसे प्रमुख राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या घरी; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Revati Lele Wedding: प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; पुण्यातील राहत्या घरी झाला ग्रहमख विधी; PHOTO पाहा

Amol Kolhe: विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते, रोहित पवारांचा दावा कितपत खरा?, कोल्हे म्हणाले...

Accident News : टिटवळ्यात विचित्र अपघात! भरधाव कंटेनरने १० ते १५ वाहनांना दिली धडक

SCROLL FOR NEXT