Manasvi Choudhary
आजही आपण केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करतो मात्र केमिकलयुक्त शॅम्पूपेक्षा तुम्ही घरगुती उपाय करू शकता.
फार पूर्वीपासून केस धुण्यासाठी रीठा वापरतात. रीठाने केस धुतल्याने शॅम्पूप्रमाणे फेस येतो.
रीठ्यामध्ये आवळा, शिकेकाई मिक्स केल्याने केसांना फायदा होतो. केसांची वाढ होते.
मुलताना माती ही केसांसाठी नैसर्गिकरित्या गुणकारी आहे. केस धुण्यापूर्वी तासभर आधी पाण्यात मुलतानी माती भिजत घालून ती पावडर केसांना लावा यामुळे केसातील कोरडेपणा कमी होतो.
केस धुण्यासाठी शाम्पूऐवजी अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करा यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.
केस निरोगी राहण्यासाठी, केसांच्या समस्या कमी होण्यासाठी बोराच्या पाण्यांनी केस धुणे फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.