Wednesday Horoscope Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Wednesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार आहे. तर काही राशींच्या लोकांच्या प्रेमात वाद होणार आहे.

Anjali Potdar

आजचे पंचांग

बुधवार,३० जुलै २०२५,श्रावण शुक्लपक्ष,श्रियाळ षष्ठी.

तिथी- हस्त

रास-कन्या

नक्षत्र-हस्त

योग-सिद्धयोग

करण-कौलव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - घरगुती काही अडचणींमध्ये व्यस्त रहाल. जोडीदारासाठी पैसा खर्च करावा लागेल. ठरवलेल्या गोष्टी तशाच होणार नाहीत. दिवसाचे संमिश्र फल आहे.

वृषभ - कलाकारांना विशेष प्रगती आणि गतीचा दिवस आहे. शेअर्समध्ये पैसा मिळेल. धनयोग, लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. देवी उपासना करावी.

मिथुन - नवे संकल्प घेऊन काहीतरी कार्य कराल. कुटुंबीयांच्या सहकार्याने पुढे जाल. व्यवसायामध्ये गती प्रगती दोन्ही आहे. धावपळ असली तरी यश मिळेल.

कर्क - प्रवासासाठी दिवस उत्तम आहे. आपण करत असलेल्या कार्याला मोठा सलाम मिळेल. भावनिकता बाजूला ठेवून धाडसाने पावले आज उचलावी लागतील. दिवस चांगला आहे.

सिंह - घरातील लोकांच्याकडून विशेष लाभाचे दिवस आहेत. कौटुंबिक सौख्याला दिवस चांगला आहे. आपला वरचढपणा आणि दबदबा इतरांवर राहील. दिवस आनंदी आहे .

कन्या - व्यवहाराच्या गोष्टी आज जपून कराव्यात. मनस्वी आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न कराल. आरोग्य उत्तम राहील सकारात्मकता वाढेल. दिवस समाधानी आहे.

तूळ - संतती पासून त्रास संभवतो आहे. त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. विनाकारण मनोबल कमी राहील. खर्चाला धरबंद राहणार नाही. अध्यात्मिक कास धरावी लागेल.

वृश्चिक - प्रेमामध्ये थोडेसे वाद-विवाद होतील. आपल्या जोडीदाराला समजून घेणे आज गरजेचे आहे. यामध्ये मित्र-मैत्रिणींच्या सहकार्यामुळे वाद संपुष्टात सुद्धा येतील. दिवस बरा आहे.

धनु - कार्यक्षेत्रामध्ये आघाडीवर रहाल. सामाजिक क्षेत्रामध्ये पद प्रतिष्ठा मिळणार आहे. ठरवेल त्या गोष्टी घडतील. व्यावसायिक संबंध दृढ होतील. सहकारी मदत करतील.

मकर - शिव उपासना विशेष फलदायी ठरेल. मोठ्या प्रवासाचे नियोजन होईल. तीर्थक्षेत्री भेटी होतील. दिवस आनंदी आहे अनेक दिवस वाट बघत असलेल्या सुवार्ता कानी येतील.

कुंभ- वाईट गोष्टींपासून स्वतःला चार हात लांब ठेवणे आज बरे आहे. कोणी आरेरावीने वागत असेल तर त्याला प्रत्युत्तर न देणे योग्य ठरेल. दिवसाच्या शेवटी आलेल्या अडचणींवर मात झालेली दिसेल.

मीन - कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने उभे राहतील. कोर्टकचेरीची कामे सुद्धा मार्गी लागतील. पण त्यामधून निश्चितपणे काहीतरी चांगले निर्णय आज निघतील. जोडीदाराबरोबर प्रेमाचे संबंध दृढ होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atharv Sudame Reel Video: गणेशोत्सवानिमित्त केलेल्या रिलवरून प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे वादात; सामाजिक संदेश देणं पडलं महागात

Sinhagad Missing: गौतम गायकवाडनंतर सिंहगडवर पाच मुलं बेपत्ता; पुण्यात खळबळ|VIDEO

Thane Politics: शहापुरात मोठी राजकीय उलथापालथ! मविआच्या २७ मोठ्या नेत्यांचा भाजपात प्रवेश

Bigg Boss 19: बिग बॉसमध्ये 'या' स्पर्धकाच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षक नाराज; दिला पहिलं एलिमिनेट करण्याचा सल्ला

Trump Tariffs vs India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा फुगा फुटणार; पीएम मोदींनी आखला नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT