Shukra Gochar saam Tv
राशिभविष्य

Shukra Gochar 2025: धनदाता शुक्र पापी ग्रहाच्या घरात करणार प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Shukra Gochar 2025 effects: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, ज्याला 'गोचर' म्हणतात. ग्रहांच्या या बदलांचा थेट परिणाम मानवी जीवनावर, विशेषतः आर्थिक परिस्थितीवर होत असतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला प्रेम, आकर्षण, ऐश्वर्य, विवाह आणि सौंदर्याचा कारक मानण्यात येते. प्रत्येक महिन्यात शुक्र ग्रह राशी आणि नक्षत्र बदल करतो, ज्याचा परिणाम सर्व १२ राशींवर दिसून येतो. यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीला शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

येत्या ७ नोव्हेंबर रोजी रात्री ९:१३ वाजता तो स्वाति नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हे नक्षत्र राहूच्या अधिपत्याखाली असून तूळ राशीत स्थित आहे. शुक्र या काळात मालव्य राजयोग निर्माण करत असल्यामुळे काही राशींना शुक्र आणि राहूची विशेष कृपा मिळू शकणार आहे.

मेष राशी

शुक्राचा स्वाति नक्षत्रातील प्रवेश मेष राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा मोठा ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मोठे प्रोजेक्ट्स आणि चांगले क्लायंट मिळू शकतात. मित्रांसोबत एखादी खास यात्रा होण्याची शक्यता आहे, मनाला समाधान मिळेल अशी बातमी तुमच्या कानी येणार आहे

मिथुन राशी

मिथुन राशीसाठी शुक्र पंचम आणि द्वादश भावाचा स्वामी आहे. त्याचा तुला राशीत आणि स्वाति नक्षत्रात पंचम भावात गोचर शुभ फलदायक ठरणार आहे. या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. धनवृद्धीचे प्रयत्न यशस्वी ठरू शकणार आहे. पदोन्नती किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना विशेषतः शेअर बाजार, गुंतवणूक किंवा सट्टा क्षेत्रात मोठा फायदा होऊ शकतो.

सिंह राशी

सिंह राशीसाठीही शुक्राचा राहूच्या नक्षत्रातील प्रवेश सकारात्मक संकेत घेऊन येणार आहे. करिअरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीची आणि कामगिरीची प्रशंसा होणार आहे. व्यवसायिकांसाठीही ही वेळ लाभदायक असणार आहे. यावेळी कमाईत वाढ होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात कोणते उद्योगधंदे भरभराटीस होते?

Double Decker Flyover: वर मेट्रो अन् खाली उड्डाणपूल; नवी मुंबई ते भिंवडीचा प्रवास होणार सुसाट; कल्याण-डोंबिवलीमधून जाणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! इस्लामपूर नव्हे, आता ईश्वरपूर

MHADA Lottery: पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, वाकड अन् हिंजवडीत घ्या फक्त २८ लाखांत घर; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Bridal Makeup Tips: यावर्षी लग्न ठरलयं? मग 'पिक्चर-परफेक्ट' ब्राईडल लुकसाठी या ७ टिप्स नक्की करा फॉलो

SCROLL FOR NEXT