Shukra Planet Gochar In Tula saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar: शुक्र ग्रह स्वतःच्याच राशीत करणार गोचर; 'या' राशींच्या नशीबाचा तारा चमकणार

Shukra Planet Gochar In Tula: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा राशी बदल मानवी जीवनात मोठे बदल घडवून आणतो. धन, सौंदर्य, प्रेम, विलास आणि वैवाहिक सुखाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह (Venus) लवकरच आपल्या स्वतःच्या तूळ (Libra) राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह साधारणतः दर महिन्याला एकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. शुक्र ग्रहाला वैवाहिक जीवन, संपत्ती, ऐश्वर्य, भौतिक सुखसोयी आणि सौंदर्य यांचा कारक मानलं जातं. नोव्हेंबर महिन्यात शुक्र ग्रह आपली स्वराशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहेत.

या गोचर काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. विशेषतः तीन राशींना या काळात भाग्याची साथ मिळणार असून धनवृद्धी आणि प्रगतीचे उत्तम योग निर्माण होतील. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मकर रास

मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रहाचा हा गोचर अत्यंत अनुकूल ठरू शकणार आहे. कारण हा गोचर त्यांच्या कुंडलीत करिअर आणि व्यवसायाच्या स्थानी होतोय. त्यामुळे या काळात कामकाजात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळू शकते, तर व्यवसायिकांना गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ करिअर आणि आर्थिक दृष्ट्या प्रगतीचा ठरेल.

मेष रास

मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रहाचा गोचर अत्यंत लाभदायक ठरू शकतो. विवाहितांना जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य आणि साथ मिळणार आहे. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. जे लोक पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात त्यांच्यासाठीही हा काळ अनुकूल ठरणार आहे. ज्याचा सामाजिक व व्यावसायिक आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल.

कुंभ रास

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रहाचा हा गोचर भाग्यवृद्धीचा काळ ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह त्यांच्या कुंडलीत भाग्यस्थान आणि विदेश स्थानावरून प्रवास करणार आहेत. त्यामुळे या काळात नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. जे विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांची मनोकामना पूर्ण होऊ शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढणार, हिना गावित यांची आज घरवापसी

Maharashtra Live News Update: मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट

Heart blockage: मान किंवा जबड्यामध्ये वेदना होतायत? हृदयाच्या धमन्या ब्लॉक होण्यापूर्वी पाहा कोणते 5 संकेत मिळतात

Nilesh Sable : निलेश साबळेचा नवाकोरा शो; लाडक्या वहिनींसाठी भन्नाट गिफ्ट, नावही आहे खास

Shocking News : कंपनी मॅनेजरची कर्मचारी महिलेवर वाईट नजर, बलात्कार करून खंडणी उकळली, बायकोचीही नवऱ्याला साथ

SCROLL FOR NEXT