Shukra Grah  Astro Tare
राशिभविष्य

Shukra Gochar: डिसेंबर महिन्यात शुक्र ग्रह करणार डबल गोचर; 'या' राशींना कमवणार नुसता पैसा, उत्पन्नही वाढणार

Shukra Gochar 2024: शुक्र 2 डिसेंबर रोजी दुपारी 12:05 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि 28 डिसेंबर 2024 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह एकाच महिन्याच दोन वेळा राशी बदलतात. 2024 च्या शेवटी अनेक ग्रह राशी बदलणार असून राक्षसांचा स्वामी शुक्र डिसेंबर महिन्यात एकदा नाही तर दोनदा राशी बदलणार आहे. शुक्र सुमारे 26 दिवसांमध्ये त्याच्या राशीत बदल करतो.

शुक्र 2 डिसेंबर रोजी दुपारी 12:05 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि 28 डिसेंबर 2024 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाच्या या डबल गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. यावेळी कोणत्या राशींना यावेळी सकारात्मक परिणाम मिळणार आहे ते पाहूयात.

कुंभ रास

डिसेंबर महिन्यात शुक्र या राशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या घरात असणार आहे. या काळात या राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. यावेळी तुमच्या कामाचं कौतुक होईल. सहकाऱ्यांमध्ये तुमचा आदर वाढणार आहे. अपार संपत्ती मिळू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रातही भरपूर फायदा होणार आहे.

सिंह रास

या राशीत शुक्र सहाव्या आणि सातव्या घरात असणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही खूप फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेला वाद संपुष्टात येणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.

वृषभ रास

शुक्र हा चढत्या राशीचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. यातून तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. कुटुंबासोबत सुरू असलेले मतभेद संपुष्टात येऊ शकणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hitendra Thakur : पत्रकार परिषद घेऊ नका, असं कोणत्या कायद्यात आहे? हितेंद्र ठाकूर यांचा सवाल, VIDEO

Parola News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon Election: पाचोऱ्यात मविआच्या उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक, आमदारावर आरोप

Vinod Tawde : '४० वर्षे निवडणुकीत...'; पैसे वाटप केल्याच्या आरोपावर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...VIDEO

Maharashtra News Live Updates: अनिल देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

SCROLL FOR NEXT