Kendra Trikon Rajyog saam tv
राशिभविष्य

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Kendra Trikon Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार अनेक शुभ-अशुभ योग तयार होत असतात. वैभव आणि समृद्धीचा कारक ग्रह मानला जाणारा शुक्र (Venus) लवकरच एक अत्यंत शुभ योग तयार करणार आहे. हा योग म्हणजेच ‘केंद्र त्रिकोण राजयोग’.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांपैकी शुक्र हा एक प्रभावशाली ग्रह मानला जातो. दैत्यांचा गुरु मानल्या जाणाऱ्या शुक्राला धन, वैभव, सुख-समृद्धी, संपत्ती, प्रेम, आकर्षण आणि भोग-विलास यांचा कारक मानला जातो. शुक्र ठराविक कालांतराने राशी बदलतो आणि त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिसून येतो. साधारणपणे २६ दिवसांनी शुक्र राशी बदलतो आणि त्यामुळे पूर्ण राशिचक्र पूर्ण करण्यास त्याला सुमारे ११ ते १२ महिने लागतात.

नोव्हेंबर महिन्यात शुक्र आपली स्वगृही असलेली तूळ राशी गाठणार आहे. शुक्राच्या तूळ राशीत आगमनामुळे अनेक शुभ योगांची निर्मिती होणार आहे. या काळात मालव्य योग, पराक्रम योग तसंच केंद्र-त्रिकोण राजयोग तयार होत असून काही राशींना त्याचा विशेष लाभ मिळणार आहे.

वैदिक ज्योतिषानुसार, शुक्र २ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून २१ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी २६ नोव्हेंबरपर्यंत तो स्थिर राहणार आहे. केंद्र-त्रिकोण राजयोग हा तेव्हाच घडतो जेव्हा शुक्र केंद्रस्थानांमध्ये किंवा त्रिकोणस्थानांमध्ये विराजमान होतो. हा योग अत्यंत शुभ मानला जातो.

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राच्या प्रभावामुळे निर्माण होणारा केंद्र-त्रिकोण राजयोग अत्यंत फलदायी ठरणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. भौतिक सुखसुविधांचा लाभ मिळेल तसंच कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत करण्याची संधी मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते. व्यापारात कार्यरत असलेल्या लोकांना विशेष नफा मिळेल.

तूळ राशी

तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या स्वगृही आगमनामुळे अनेकपटींनी अधिक लाभ होणार आहे. केंद्र-त्रिकोण राजयोगाबरोबर इतरही शुभ योगांची निर्मिती होत असल्याने प्रत्येक क्षेत्रात यश आणि आर्थिक वृद्धी होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ चालू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडणार आहेत. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहील.

मकर राशी

मकर राशीच्या व्यक्तींसाठी करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात शुक्राच्या प्रभावामुळे केंद्र-त्रिकोण राजयोग घडणार आहे. हा काळ अत्यंत शुभ आणि लाभकारी ठरणार आहे. कुटुंबासोबतचा वेळ आनंददायी जाईल तसेच पालकांचे सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT