Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Gajlaxmi Rajyog 2026: पुढच्या वर्षी शुक्र बनवणार पॉवरफुल योग; 'या' 3 राशींच्या नशीबी धनलाभ

Venus powerful yog: ज्योतिषशास्त्रात सौंदर्य, प्रेम, भौतिक सुख आणि संपत्तीचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह, पुढील वर्षी एका विशिष्ट राशीत प्रवेश करून अत्यंत शक्तिशाली 'राजयोग' तयार करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

देवगुरु बृहस्पती यांना ज्ञान, शिक्षण, धन, धर्म, अध्यात्म, विवाह यांचं कारक मानलं गेलं आहे. गुरु ग्रहाच्या स्थितीमध्ये जरासा जरी बदल झाला तर स्थितीत बदल झाल्यास सर्व राशींवर त्याचा परिणाम दिसून येतो. मे २०२५ मध्ये गुरु मिथुन राशीत प्रवेश करून अतिचारी गतीने चालू लागलाय. पुढील ८ वर्षे ते या गतीनेच चालणार आहे. त्यामुळे ते एका राशीत पूर्ण वर्ष न राहता काही महिन्यांसाठी दुसऱ्या राशीतही गोचर करणार आहेत.

नव्या वर्षी २०२६ मध्ये गुरु मिथुनसोबत कर्क आणि सिंह राशीतही गोचर करणार आहे. या काळात गुरु शुक्रासोबत युती करून गजलक्ष्मी राजयोग तयार करणार आहे. हा योग अत्यंत शक्तिशाली मानण्यात येतो. यावेळी काही राशींना अपार यश, धनवृद्धी आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळवून देऊ शकणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, वैभवाचे दाता शुक्र १४ मे २०२६ रोजी सकाळी १०:५८ वाजता मिथुन राशीत प्रवेश करतील. याठिकाणी आधीपासूनच गुरु विराजमान असल्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. हा योग २ जूनपर्यंत मिथुन राशीत राहील. त्यानंतर गुरु कर्क राशीत प्रवेश करतील आणि ८ जूनला शुक्रही कर्क राशीत पोहोचतील. त्यामुळे पुन्हा गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

वृश्चिक राशी (Scorpio)

या राशीच्या अष्टम आणि नवम भावात गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. यावेळी दीर्घकाळापासून अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. यावेळी मेहनतीचं फळ मिळेल, उत्पन्न वाढेल आणि भविष्यासाठी धनसंचय करता येणार आहे. शिक्षण क्षेत्रात लाभ होईल, स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणात यश मिळेल.

मेष राशी (Aries)

मेष राशीच्या कुंडलीत गजलक्ष्मी राजयोग तिसऱ्या आणि चौथ्या भावात तयार होणार आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून अडकलेली कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवता येणार आहे. गुरुची सप्तम दृष्टि कर्म आणि भाग्य भावावर पडत असल्यामुळे करिअरमध्ये प्रगती, पदोन्नती आणि सन्मान मिळेल.

तूळ राशी (Libra)

तूळ राशीच्या कुंडलीत नवम आणि दशम भावात गुरु-शुक्राची युती होणार आहे. त्यामुळे गजलक्ष्मी राजयोग या राशीसाठी अत्यंत शुभ ठरेल. करिअरमध्ये मोठा लाभ होईल, पद-प्रतिष्ठा वाढेल. या काळात तुम्हाला नवीन संधी मिळतील. अविवाहितांना विवाह प्रस्ताव मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, तिघांवर गुन्हा दाखल

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला फिरकीच्या जाळ्यात गुंडाळणार; टीम इंडिया मैदानावर उतरवणार ४ हुकुमी एक्के

Bihar Election Result Live Updates: एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला, कोण किती जागांवर आघाडी?

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराच्या घरातच फूट; काकांनी सोडली साथ, नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढली

8th Pay Commission : आठवा वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट, २०२९ लोकसभेआधी कर्मचार्‍यांचा पगार वाढणार; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT