Shukra Nakshatra Parivartan 2025 saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar 2025: 27 महिन्यांनी शुक्र करणार बुधाच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींना आहेत धनलाभाचे योग

Venus transit in Mercury constellation: प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली जागा बदलतो, ज्यामुळे शुभ-अशुभ योग तयार होतात. धन, वैभव, प्रेम आणि समृद्धीचा कारक ग्रह शुक्र तब्बल २७ महिन्यांनंतर बुध ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष शास्त्रात शुक्र हा एक प्रभावशाली ग्रह मानला जातो. संपत्ती, वैभव, आकर्षण, प्रेम आणि भोगविलास यांचं कारक असलेला शुक्र काही हा एका वेळेनंतर त्याची रास आणि नक्षत्र बदल करतो. त्याचा थेट परिणाम सर्व राशींवर जाणवतो. सध्या शुक्र कर्क राशीत आहे आणि आता तो आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

बुधाच्या नक्षत्रात शुक्राचा प्रवेश झाल्याने काही राशींना विशेष लाभ होणार आहे. वैदिक पंचांगानुसार, ३ सप्टेंबर रोजी रात्री ११:५७ वाजता शुक्र आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. आश्लेषा हा २७ नक्षत्रांपैकी ९वा नक्षत्र असून त्याचा स्वामी ग्रह बुध आहे. या बदलामुळे मिथुन, कर्क आणि कन्या या तीन राशींना मोठा फायदा होणार आहे.

मिथुन रास

या राशीत शुक्र आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करून दुसऱ्या भावात विराजमान होणार आहे. या राशीसाठी शुक्र पाचव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी असल्यामुळे हा गोचर अत्यंत शुभ मानला जात आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला आणि कामगिरीला योग्य तो सन्मान मिळणार आहे. वैवाहिक जीवन गोड राहील आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.

कर्क रास

कर्क राशीत शुक्र लग्न भावात विराजमान होणार आहे. भाग्याची साथ मिळणार आहे. बऱ्याच काळापासून अडकलेलं काम पूर्ण होणार आहे. कुटुंबात समाधान आणि आनंद वाढणार आहे. पण हेच प्रवास तुमच्या यशाचे दार उघडणार आहेत. व्यापाऱ्यांसाठीही हा काळ खूपच फायदेशीर आहे.

कन्या रास

या राशीत शुक्र अकराव्या भावात विराजमान होणार आहे. ज्यामुळे तुम्हाला भरघोस लाभ मिळतील. या काळात तुमचे नशिब तुमच्याबरोबर राहणार आहे. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि भविष्यासाठी बचत करण्याची संधी मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Council: जीएसटी बदलाचा सर्वाधिक फायदा महिलांना; या वस्तू झाल्या स्वस्त | VIDEO

Chanakya Niti: मानवाच्या या ५ गोष्टी जन्माआधीच ठरतात, त्या कधीच बदलू शकत नाहीत

New GST Rates : चैनीच्या वस्तू महागणार! ४० टक्क्यांच्या स्लॅबमध्ये कोणत्या वस्तू? सर्व यादी एका क्लिकवर

Maharashtra Live News Update: राज्य सरकारच्या जीआरविरोधात पुण्यात आज ओबीसी संघटनांच्या वतीने आंदोलन

Duty Hours Increase: कामगारांसाठी महत्वाची बातमी! कामाचे तास वाढले, यापुढे ९ ऐवजी १२ तासांची ड्युटी

SCROLL FOR NEXT