Shani Shukra Ardhakedra Yog saam tv
राशिभविष्य

Ardhakedra Yog: ३ दिवसांनी शुक्र-शनी बनवणार अर्धकेंद्र योग; व्यवसायात होणार दुप्पट लाभ, प्रेमसंबंध सुधारणार

Shani Shukra Ardhakedra Yog: शनी-शुक्रामुळे अर्ध-केंद्र संयोग तयार होणार असून यावेळी काही राशींच्या व्यक्तींचं आयुष्य चमकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला खास महत्त्व देण्यात आलेलं आहे. यामध्ये शु्क्र आणि शनी ग्रहाला महत्त्वपूर्ण मानलं जातं. शनी ग्रह प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. तर शुक्र आकर्षणाचा कारक मानला जातो. पण दोन्ही ग्रह एकमेकांचे मित्र आहेत.

सध्या शनी कुंभ राशीच्या मूळ त्रिकोण राशीत आहे. याशिवाय शुक्र शनीच्या राशीत मकर राशीत स्थित असेल. अशा स्थितीत दोन्ही ग्रह एकमेकांसोबत अर्धकेंद्र योग तयार करतायत. 5 डिसेंबर रोजी शुक्र आणि शनि संध्याकाळी 7:07 वाजता 45 अंशांवर असणार आहे. ज्यामुळे अर्ध-केंद्र संयोग तयार होणार असून यावेळी काही राशींच्या व्यक्तींचं आयुष्य चमकणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मेष रास

या राशीमध्ये शुक्र दहाव्या घरात आणि शनि अकराव्या घरात स्थित आहे. यावेळी या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदा होण्याची शक्यता. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग देखील फायदेशीर ठरू शकणार आहे. उत्तम नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. लव्ह लाईफ चांगलं राहणार आहे. तुमच्या कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मकर रास

या राशीच्या लोकांनाही शनि आणि शुक्राचा विशेष आशीर्वाद मिळू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तुम्हाला नशिबाने पूर्ण साथ मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी लाभ मिळणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Shocking : महाराष्ट्र हादरला! मुलाने केली वडिलांची हत्या, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT