September Grah Gochar saam tv
राशिभविष्य

Grah Gochar: दिवाळीपूर्वी २ ग्रह करणार त्यांच्या राशीत बदल; 'या' ३ राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

Planetary Transit before Diwali 2025: यंदाची दिवाळी काही राशीच्या लोकांसाठी लवकरच आनंदाची आणि भरभराटीची बातमी घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीचा दीपोत्सव सुरू होण्यापूर्वीच, धन आणि समृद्धी देणारे दोन महत्त्वाचे ग्रह आपले राशी परिवर्तन (Graha Gochar) करत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरला अत्यंत महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. प्रत्येक ग्रह आपल्या निश्चित कालावधीनंतर राशी बदलतो. त्यामुळे या बदलाचा परिणाम सर्व म्हणजेच १२ राशींवर दिसून येतो. काही राशींना या बदलामुळे शुभ फल मिळण्यास मदत होते.

या वर्षी दिवाळीच्या आधी दोन महत्त्वाचे ग्रह म्हणजेच सूर्य आणि गुरु आपली चाल बदलणार आहेत. सूर्य तुला राशीत प्रवेश करेल, तर गुरु कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आणि गुरु यांच्या या परिवर्तनामुळे काही राशींना अच्छे दिन येणार आहेत.

ज्योतिष्य तज्ज्ञांनुसार, यामुळे काही राशींना नशिबाची साथ लाभणार आहे. तर काहींना आर्थिक व व्यावसायिक स्थितीत सुधारणा होणार आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक जीवनातही अनेक सकारात्मक घडामोडी घडतील. यामध्ये कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ राशी

या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. विशेषतः मातेकडून किंवा घरच्या मोठ्यांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सौख्य वाढणार आहे. घरगुती वातावरणात आनंदाचे क्षण निर्माण होणार आहे. एखाद्या मित्राच्या मदतीने नवीन रोजगाराच्या संधी मिळू शकतात.

कर्क राशी

या काळात आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. घरात धार्मिक कार्यांचे आयोजन होऊ शकणार आहे. उच्च शिक्षण, संशोधन किंवा परदेशी प्रवासाशी संबंधित संधी मिळू शकणार आहेत. नोकरीत कार्यक्षेत्रात बदल किंवा बदली होण्याचे योग आहेत. कुटुंबातील वडिलधाऱ्यांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशी

घरगुती जीवनात सुख-सुविधांचा विस्तार होणार आहे. पालकांचं सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. घरात ऐश्वर्यवृद्धीचे वातावरण निर्माण होऊ शकतं. नवीन कपडे, वस्तू आणि भौतिक सुखसुविधांकडे आकर्षण वाढणार आहे. शिक्षणात चांगली प्रगती होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात समाधानकारक परिणाम मिळू शकणार आहेत.

तूळ राशी

मन प्रसन्न आणि शांत राहणार आहे. शिक्षण, अभ्यास व संशोधनाशी संबंधित क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी किंवा संशोधनासाठी बाहेरगावी जावं लागू शकतं. नोकरीत वरिष्ठांचा सहकार्य लाभेल आणि पदोन्नतीचे नवे मार्ग खुलणार आहेत. उत्पन्नात वाढ होईल तसेच साठवलेल्या संपत्तीतही भर पडणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani Heavy Rain : आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणी जिल्ह्यात मुसळधार; अनेक रस्ते पाण्याखाली, घरातही शिरले पाणी

Maharashtra Live News Update : थोड्याच वेळात नगरपालिका, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर होणार

मोठी बातमी! २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, वाचा सविस्तर

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळच्या घरावर छापा, महत्त्वाची कागदपत्रं जप्त | VIDEO

Vijay Deverakonda : साखरपुड्यानंतर विजय देवरकोंडा पहिल्यांदाच दिसला; हातातील अंगठीनं वेधलं लक्ष, पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT