Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : आनंदी आनंद होणार, आयुष्यात सुंदर घटना घडतील; ५ राशींच्या लोकांचे नशीब चमकणार

Tuesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात सुंदर घटना घडतील. काही राशींच्या लोकांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

पंचांग

मंगळवार,१४ ऑक्टोबर २०२५,अश्विन कृष्णपक्ष.

तिथी-अष्टमी ११|१०

नक्षत्र- पुनर्वसु

रास-कर्क

योग-सिद्ध

करण-कौलव

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - पैसा, धनदौलत, सौख्य या गोष्टी सर्वांनाच हव्या असतात .आपली रास ही काही त्याला अपवाद नाही. सर्व सुखाच्या दृष्टीने आनंद मिळण्यासाठी आज प्रयत्न कराल आणि अशा गोष्टी मिळतीलही सौख्यकारक दिवस आहे.

वृषभ- "जे पेराल ते उगवते" असे म्हटलेले आहे. आज पराक्रम पेरा त्याचेच झाड येईल. व्यवसायामध्ये भाग्यकारक घटना घडणार आहेत. एक वेगळीच ताकद आणि उमेद आज आपल्याकडे असेल.

मिथुन - काही काही वेळा "दुधात मिठाचा खडा" अशा काही गोष्टी येतात. सगळे छान चालू असताना धनाची आवक जावक उत्तम आहे. धनयोग चांगले आहेत, पण जोडीदाराच्या तब्येतीच्या तक्रारीने आज मन उद्विग्न होईल. काळजी घ्या.

कर्क- प्रपंच करण्यासाठी असणाऱ्या गोष्टी आज चार हात लांब ठेवाव्या असे वाटेल. इतरांचे करता करता आपल्याकडे दुर्लक्ष करत आलो आणि म्हणून आज स्वतःकडे लक्ष द्याल. हाच आनंद उपभोगण्याकडे आज कल आहे.

सिंह - "वाळू मधील रेघोट्या" असा काहीसा दिवस आहे. सगळे करून दिवसाच्या शेवटी हाती काही लागले नाही असा दिवस असेल. मनस्थिती ठीक ठेवावी लागेल. असेलच असे नाही.

कन्या - सातत्याने चौकसपणा आणि हिशोबिपणा सगळीकडे कामास येत नाही काही वेळेला मोकळे पणाने जगून बघावे लागते. आपल्याच लोकांच्या पासून आपल्याला आनंद आणि लाभ दोन्ही मिळणार आहेत. काळजी नसावी.

तूळ - काही गोष्टी न ठरविता आज घडणार आहेत. प्रवासामध्ये प्रगती होईल. समाजशी निगडित काहीतरी कार्य करावे अशी खुमखुमी येईल आणि त्या दृष्टीने पुढाकार सुद्धा घ्याल.

वृश्चिक - आयुष्यात कमी अधिक गोष्टी घडत राहतात. पण आज काही गोष्टी सोप्या होणार आहेत. भाग्यकारक घटना घडतील. "देव आला द्यायला झोळी नाही घ्यायला" अशी अवस्था होईल. इतक्या सुंदर घटना होतील.

धनु - आज गुढतेची आवड निर्माण होईल. आज या विचाराने मन पछाडलेले असेल. मृत्यू म्हणजे काय? गूढ गोष्टी कशा असतात? मग मंत्र, काळी जादू ,तंत्र या शोधण्याच्या दृष्टीने आज पेटून उठाल. गुप्तधनाविषयी सुद्धा गोष्टी आज जागृत होतील.

मकर - प्रेरणादायी प्रवास असावा असे आपल्याला नेहमी वाटते. आपल्या लोकांना बरोबर घेऊन संस्कार, सुशीलता सांभाळून आजपर्यंत संसार केला आहे. जोडीदाराची साथ आजही चांगली मिळेल. संततीकडून पराक्रमाच्या गोष्टी घडून येतील.

कुंभ - काहीतरी पत्रकारिता आज तुमच्यामध्ये उपजेल .कधी कधी नव्याने शोधून काढणे, इतरांच्या गोष्टींमध्ये दखलबाजी करणे अशा गोष्टी आपल्या राशीला आवडतात. मात्र हित शत्रूंचा त्रासही वाढणार आहे. काळजी घ्या.

मीन - प्रेमामध्ये बहार आहे.अर्थात आपली रास तशी आहे. काही गोष्टी संथपणे घडत राहतात. मात्र शेअर्स आणि लॉटरीमध्ये पैशाची गुंतवणूक करणार असाल तर आज दिवस संधी घेऊन आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

Hindu Festivals: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

Virat Kohli : लिलावापूर्वी करार करण्यास नकार, IPL 2026 मध्ये विराट कोहली RCB कडून खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT