Trigrahi Yog In Mithun 2025 saam tv
राशिभविष्य

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणार त्रिग्रही राजयोग; शुक्र-सूर्य देवाच्या कृपेने काही राशींचं आयुष्य पालटणार

Tirgrahi Yoga In Leo: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार अनेक शुभ-अशुभ योग तयार होत असतात. काही योग इतके दुर्मिळ असतात की ते अनेक वर्षांनंतर तयार होतात. लवकरच एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा त्रिग्रही राजयोग (Trigrahi Rajyoga) तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार, अवघ्या १२ तासांमध्ये धनाचे अधिपती शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. या राशीत आधीच ग्रहांचा राजा सूर्य आणि केतू विराजमान आहेत. त्यामुळे सिंह राशीत त्रिग्रही योगाची निर्मिती होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, या योगामुळे काही राशींचं भाग्य उजळणार असून अचानक धनलाभ होणार आहे. यावेळी तुमच्यासाठी प्रगतीची संधी मिळणार आहे. यावेळी राशींवर या योगाचा विशेष परिणाम होणार आहे ते पाहूयात.

धनु रास

त्रिग्रही योग धनु राशीच्या व्यक्तींना लाभदायी ठरणार आहे. सूर्य, शुक्र आणि केतू यांचा संयोग या राशीच्या नवव्या भावात होत असल्याने भाग्याचा साथ लाभणार आहे. या काळात धर्मकर्माची आवड वाढणार आहे. नशिबाच्या जोरावर अडकलेली कामे पूर्ण होणार आहे. व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळू शकतो.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योगाचा मोठा फायदा होणार आहे. हा योग करिअर आणि व्यवसायाशी संबंधित भावात होत असल्याने प्रगतीची चिन्हं दिसतील. या काळात नवे मित्र जोडले जातील आणि सामाजिक क्षेत्रातून लाभ मिळणार आहे.कार्यक्षेत्रातील तुमच्या मेहनतीकडे वरिष्ठांचे लक्ष जाणार आहे. व्यापाऱ्यांना या काळात भरघोस नफा मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशी

कर्क राशीच्या जातकांसाठी हा त्रिग्रही योग शुभफलदायी ठरणार आहे. हा योग धनभावात तयार होत असल्याने आर्थिक प्रगतीचे संकेत मिळत आहेत. तुमच्या बोलण्यात आकर्षण आणि प्रभाव वाढणार आहे. या काळात तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील. नोकरी व व्यवसायात प्रगती होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Chopra: देस गर्ल प्रियांकाचा आइवरी लेहेंग्यातील लूक व्हायरल, पाहा PHOTO

IND vs SA : मायदेशात धूळधाण, फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया; आफ्रिकेचा ३१ रन्सने विजय

ठाण्यात मोठी उलथापालथ! कट्टर समर्थकाने ऐनवेळी राष्ट्रवादी सोडली, आता आव्हाडांच्या पत्नी मैदानात

Maharashtra Live News Update: नेव्हल डॅकमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन, परिसरात सर्च ऑपरेशन

Sherlyn Chopra: प्रसिद्ध अभिनेत्रीने सर्जरीनंतर दाखवला सिलिकॉन आणि नॅचरल ब्रेस्ट मधला फरक, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT