Shani Margi: 30 वर्षांनंतर गुरुच्या घरात सरळ चाल चालणार शनी; 'या' राशींना येत्या काळात होणार धनलाभ

Saturn Planet Margi 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांच्या स्थितीमुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. कर्मफळदाता शनि ग्रह सुमारे अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो. पण तब्बल ३० वर्षांनंतर शनि ग्रह भाग्य आणि ज्ञानाचा कारक ग्रह असलेल्या गुरूच्या राशीत थेट प्रवेश करणार आहे.
Shani Vakri
Shani Vakrisaam tv
Published On

ज्योतिषशास्त्रात शनिला कर्मफळदाता मानलं जातं. ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात म्हणून त्यांना सर्वात कठोर ग्रहांपैकी एक मानलं जातं. तब्बल ३० वर्षांनंतर शनीने गुरुच्या मीन राशीत प्रवेश केला असून आता ते २०२७ पर्यंत ह्याच राशीत राहतील. या काळात त्यांच्या गतीत होणाऱ्या बदलांचा परिणाम जगभरात आणि विविध राशींवर दिसून येणार आहे.

यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात शनि मीन राशीत वक्री झाले होते. सध्याच्या काळात ते देखील वक्री अवस्थेत आहेत. नोव्हेंबरमध्ये ते मार्गी होणार असून यामुळे काही राशींवर अत्यंत सकारात्मक परिणाम दिसणार आहेत. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी शनि मार्गी होणार आहेत. या बदलामुळे काही राशींना नोकरीत प्रगती, व्यवसायात मोठा लाभ आणि आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

Shani Vakri
Navpancham Rajyog : ३ राशींचं भाग्य उजळवणार शनी-बुधाचा राजयोग; आर्थिक स्थिती होईल मजबूत, प्रमोशनही मिळेल

मिथुन राशी

मिथुन राशीसाठी शनि मार्गी होणे अत्यंत शुभ ठरणार आहे. भाग्यभावात शनी सरळ चालल्यामुळे या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळणार आहे. जे काम अडकले होते ते पूर्ण होईल आणि धनलाभ होण्याचे योग दिसतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष फलदायी ठरणार आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळतील त्याचप्रमाणे पगारवाढीची शक्यता आहे.

Shani Vakri
Budhaditya-Bhadra Rajyog: बुद्धी दाता बुध ग्रह बनवणार डबल राजयोग; 'या' राशींच्या हाती येणार पैसाच पैसा

कुंभ राशी

कुंभ राशीसाठी शनिचं मार्गी होणं अतिशय अनुकूल ठरणार आहे. शनिदेव हेच तुमचे अधिपती ग्रह असल्यामुळे त्यांचा थेट लाभ होणार आहे. सध्या या राशीवर साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे. मात्र या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे हातात येण्याची शक्यता आहे.

Shani Vakri
Budh Yam Gochar: बुध आणि यम मिळवून बनवणार अर्धकेंद्र राजयोग; 'या' राशींना मिळणार अडकलेला पैसा, धनसंपत्ती वाढणार

वृषभ राशी

वृषभ राशीसाठी हा काळ अतिशय लाभदायक असणार आहे. शनी तुमच्या राशीपासून ११व्या भावात म्हणजेच लाभभावात मार्गी होणार आहेत. या काळात उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे. नवीन कमाईचे मार्ग उघडतील आणि महत्त्वाच्या डील्स फायनल होतील. हा काळ केवळ पैसा कमावण्याची संधीच देणार नाही तर पैसा साठवण्याची संधी देखील मिळणार आहे.

Shani Vakri
Ardhakedra Yog: बुध-गुरु बनवणार दुर्मिळ राजयोग; 3 राशींच्या व्यक्तींची होणार एका रात्रीच चांदी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com