Chandra Gochar saam tv
राशिभविष्य

Chandra Gochar: चंद्राच्या गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; शनीच्या राशीतील प्रवेश ठरणार लकी

Chandra Gochar 2025: चंद्र हा ग्रह सर्वात जलद गतीने राशी बदलतो असं ज्योतिष्य शास्त्रामध्ये म्हटलंय. १८ मे रोजी चंद्र शनीच्या राशीत भ्रमण करणार आहे. ज्याचा ३ राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात, नऊ ग्रह आणि राशींमध्ये एक विशेष वर्णन केलं आहे. कोणत्याही प्रकारच्या बदलाचा १२ राशींवर वेगवेगळा परिणाम होऊ शकणार आहे. चंद्र कोणत्याही राशीत अडीच दिवस राहतो आणि सर्व राशींवर त्याचा चांगला आणि वाईट परिणाम होतो.

वैदिक पंचांग नुसार, चंद्र रविवार १८ मे रोजी पहाटे १२:०३ वाजता शनीच्या मकर राशीत भ्रमण करणार आहे. यावेळी काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकणार आहे. नोकरी आणि पैशाशी संबंधित फायदे मिळणार असून यावेळी काही राशींना चांगली संधी मिळणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना चंद्राच्या गोचरचा फायदा होणार आहे. शनीच्या राशीत चंद्राचा प्रवेश तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे.तुम्ही जे काही काम करण्याचा निर्णय घ्याल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारू शकतात. नवीन योजनांवर काम करू शकता आणि त्यामध्ये यशस्वी देखील होऊ शकता.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी वेळ चांगला राहणार आहे. यश मिळविण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न कराल. बिघडलेले संबंध सुधारण्याची शक्यता आहे. वादांपासून दूर राहाल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी चंद्राच गोचर फायदेशीर ठरू शकणार आहे. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही वादांपासून अंतर ठेवू शकणार आहात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT