Chandra Grahan 2024 saam tv
राशिभविष्य

Chandra Grahan 2024: उद्या लागणार वर्षातील शेवटचं चंद्र ग्रहण; 'या' चुका करणं टाळावं

Chandra Grahan 2024: १८ सप्टेंबर रोजी चंद्र ग्रहण लागणार आहे. ज्योतिष्य शास्त्रामध्ये ग्रहण काळात कोणतंही शुभ कार्य करण्यास मनाई असते.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच १८ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे. यापूर्वी उपवास ठेवण्यात येतो. याशिवाय १८ सप्टेंबर रोजी चंद्र ग्रहण लागणार आहे. हे यंदाच्या वर्षीचं शेवटचं चंद्र ग्रहण असणार आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये सूर्याच्या उपस्थितीमुळे चंद्रग्रहण लागणार आहे.

राहू-केतूचा प्रभाव

या चंद्र ग्रहणावेळी पृथ्वीवर राहू तसंच केतूचा प्रभाव वाढतो. दरम्यान ज्योतिष्य शास्त्रामध्ये ग्रहण काळात कोणतंही शुभ कार्य करण्यास मनाई असते. जर या नियमांकजडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या चंद्र ग्रहणादरम्यान कोणत्या गोष्टी करणं टाळलं पाहिजेत ते पाहूयात.

कधी लागणार आहे चंद्र ग्रहण?

ज्योतिष्य शास्त्रानुसार, यंदाच्या वर्षीचं दुसरं चंद्रग्रहण १८ सप्टेंबर रोजी लाणार आहे. भारतीय वेळेनुसार, चंद्र ग्रंहण सकाळी ६ वाजू १२ मिनिटांनी लागणार आहे. तर १० वाजून १७ मिनिटांनी हे समाप्त होणार आहे.

भारतात दिसणार का चंद्रग्रहण?

यंदाचं चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे चंद्र ग्रहणासंदर्भात कोणतंही सूतक पाळण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

चंद्र ग्रहणादरम्यान काय करू नये?

  • असं म्हटलं जातं, चंद्रग्रहणाच्या काळात देवी-देवतांच्या मूर्तींची पूजा किंवा स्पर्श करू नये. याशिवाय ग्रहणकाळात देवाच्या मूर्तीला स्पर्श करू नये. या काळात देवतांच्या नावाचा मंत्र जप करावा.

  • ज्योतिषांच्या मते, चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर राहूचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे या वेळी घरी चूल पेटवू नये.

  • तसंच शास्त्रानुसार, या वेळी अन्न खाण्यासही मनाई आहे. त्यामुळे ग्रहण काळात कोणतीही गोष्ट खाणं टाळावं. मात्र मुले आणि गर्भवती महिलांना खाण्याची परवानगी आहे.

  • ग्रहणाच्या वेळी झोपणं वर्ज्य मानलं जातं. त्यामुळे चंद्र ग्रहणावेळी झोपू नये.

  • तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चंद्र ग्रहणावेळी धारधार शस्त्रांचा वापर करणं टाळावं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: या भाऊबीजनिमित्त भावाला द्या खास मिठाई; झटपट बनवा हॉटेल स्टाईल बूंदीचे लाडू

Maharashtra Live News Update : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक

Shilpa Shetty Photos: लाल साडी अन् सडपातळ कंबर, शिल्पाच्या सौंदर्याने केले घायाळ

Rain : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने झोडपलं; नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Heart Attack: सकाळची ही सवय वाढवते हार्ट अटॅकचा धोका; रक्तवाहिन्या का होतात ब्लॉक?

SCROLL FOR NEXT