Grahan 2024 : पितृ पक्षात २ वेळा ग्रहण आणि ३ ग्रहांचं गोचर; 'या' राशींच्या आयुष्यात होणार उलथा-पालथ

Grahan in 2024 Astrology: ज्योतिष्य शास्त्रानुसार, पितृ पक्षाच्या १५ दिवसांत २ ग्रहण आणि ३ ग्रहांचं गोचर होणार आहे. त्यामुळे हा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकतो. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Grahan in 2024 Astrology
Grahan in 2024 Astrologysaam tv
Published On

अनंत चतुर्दशीनंतर पितृ पक्षाला सुरुवात होणार आहे. यावेळी पितृ पक्षामध्ये ग्रहण आणि ग्रहांचं गोचर दोन्ही गोष्टी होणार आहे. त्यामुळे हा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी भारी पडणार आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार, पितृ पक्षाच्या १५ दिवसांत २ ग्रहण आणि ३ ग्रहांचं गोचर होणार आहे.

१७ सप्टेंबर २०२४ पासून पितृ पक्षाला सुरुवात होणार असून २ ऑक्टोबर २०२४ पर्यंत हा काळ चालणार आहे. यावेळी १८ सप्टेंबर रोजी चंद्र ग्रहण लागणार आहे तर २ ऑक्टोबर रोजी सूर्याचं ग्रहण आहे. याशिवाय दोन मोठ्या ग्रहांचं गोचर देखील होणार आहे.

पितृ पक्षामध्ये १७ सप्टेंबर रोजी सूर्य गोचर करून कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर १८ सप्टेंबर रोजी शुक्र गोचर करणार आहे. याशिवाय २३ सप्टेंबर रोजी बुध ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. दरम्यान २ ग्रहण आणि ३ ग्रहांचं गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी नकारात्मक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Grahan in 2024 Astrology
Panchak September 2024: उद्यापासून लागणार राज पंचक; या काळात चुकूनही करू नका 'ही' कामं

कर्क रास

या १५ दिवसांमध्ये या राशींचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्यावरील कर्ज वाढू शकतं. कुटुंबातील व्यक्तींसोबत तुमचा वाद होऊ शकतो. तुमचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तूळ रास

या राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ लाभदायक ठरणार नाहीये. तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो. अनेक अडचणी तुमच्या मागे लागणार आहेत.

मकर रास

मकर राशीच्या व्यक्ती एखाद्या मोठ्या समस्येत फसणार आहेत. वडिलांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत तुमची हानी होण्याची शक्यता आहे. कर्जामुळे तुमची आर्थिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे.

Grahan in 2024 Astrology
September 2024 Rajyog : ५०० वर्षांनंतर तयार होणार शश, मालव्य सह ३ राजयोग; 'या' राशींच्या घरी बरसणार पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com