Dussehra astrology predictions saam tv
राशिभविष्य

Kendra Yog 2025: उद्या म्हणजेच दसऱ्याला 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; गुरु-बुध बनवणार पॉवरफुल योग

Dussehra astrology predictions: उद्या देशभरात विजयादशमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दसरा हा विजयाचा आणि शुभ कार्याचा दिवस मानला जातोच, पण यंदाच्या दसऱ्याला ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत दुर्मिळ आणि 'महाधन लाभ' देणारा योग जुळून आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी दसऱ्याच्या सणाला अनेक शुभ योग तयार होणार आहेत. या वर्षी दसरा २ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी देवतांचे गुरु बृहस्पती ग्रह अनेक शुभ योग निर्माण करणार आहे. सध्या बृहस्पती ग्रह मिथुन राशीत विराजमान आहेत. या राशीत राहून ते इतर ग्रहांसोबत युति करणार आहे. ज्यामुळे शुभ योग तयार होतात.

दसऱ्याच्या दिवशी बृहस्पती ग्रह बुध ग्रह सोबत संयोग करून केंद्र योग तयार करणार आहे. ग्रहांच्या राजकुमार समान बृहस्पतीच्या या संयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींची किस्मत चमकू शकणार आहे.

ज्योतिषानुसार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी २:२७ वाजता बुध आणि बृहस्पती ९० अंशाच्या अंतरावर स्थित राहतील, ज्यामुळे ‘केंद्र दृष्टि योग’ तयार होतो. बुध सध्या कन्या राशीत विराजमान आहेत. या योगामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

मेष राशीच्या जातकांसाठी बृहस्पती-बुधाचा केंद्र योग अत्यंत शुभ ठरू शकणार आहे. या काळात बुध तिसऱ्या भावात राहणार आहे. ज्यामुळे आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होणार आहे. भावंडांशी संबंध घट्ट होणार आहे. शुभ संदेश किंवा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रतिस्पर्ध्यांना चांगली आव्हानं देऊ शकाल.

कर्क रास

कर्क राशीच्या जातकांसाठी बृहस्पती-बुधाचा केंद्र योग खूप अनुकूल ठरणार आहे. या काळात दीर्घकाळ अडकलेलं काम पूर्ण होऊ शकतात. गृहस्थ जीवनातील समस्या दूर होणार आहे. आईशी संबंध सुधारतील आणि जमीन-जायदादीत फायदा मिळू शकतो. परिवार आणि मित्रांसोबत सुखद वेळ घालवता येणार आहे. आर्थिक स्थितीही सुधारेल आणि समाजात मान-सन्मान वाढणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या जातकांसाठी बृहस्पती-बुधाचा केंद्र योग अनुकूल ठरणार आहे. या काळात अनेक क्षेत्रांत अपार यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी ही वेळ फायद्याची आहे. उत्पन्न वाढेल आणि आर्थिक संचय करणं शक्य होणार आहे. भावंडांशी संबंध चांगले राहणार आहे. मुलांशी संबंधित अडचणी दूर होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

Mumbai Shivaji Park : शिवाजी पार्कवर चिखलाचं साम्राज्य; दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासमोर आव्हान | VIDEO

दुःखद! मुलाची आत्महत्या, १२ तासात बापानेही प्राण सोडले, धक्कादायक कारण चिठ्ठीतून उघड, बाप-लेकाच्या निधनाने नांदेड हादरलं

Accident: वडिलांच्या अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला, भरधाव कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT