Today's Rashi Bhavishya 6 June 2024, Horoscope Today Saam TV
राशिभविष्य

Daily Horoscope: आज शनी जयंती, कोणत्या राशीच्या नशिबांना कलाटणी मिळणार? काय आहे आजचे राशी भविष्य

Rashi Bhavishya 6 June 2024 Shani Jayanti: आज शनी जयंती आहे. त्यामुळे आज आपण काय राशी भविष्य असेलस, ते जाणून घेऊ या.

Anjali Potdar

आजचे पंचांग ६ जून २०२४

वार-गुरूवार दिनांक ६ जून २०२४, तिथी- वैशाख, दर्श अमावस्या. नक्षत्र-रोहिणी, योग-धृती, करण-चतुष्पाद, रास-वृश्चिक, भावुका-अमावस्या शैनेश्चर जयंती, दिनविशेष-अमावस्या वर्ज्य.

मेष - पैशाशी निगडित व्यवहार मार्गी लागतील.

आपली रास कायमच कामासाठी आतुर असते. उतावेळपणा हा आपला गुण आहे. याच गोष्टी धरून आज बरीच कामे कराल. पैशाशी निगडित व्यवहार आज मार्गी लागतील.

वृषभ - शनेश्वर जयंती विशेष लाभदायक.

आपल्या राशीला योगकारक असणारा शनी ग्रह आहे. म्हणूनच आजची शनेश्वर जयंती आपल्याला विशेष लाभदायक ठरणार आहे. शनी उपासना करावी. मन सकारात्मक ठेवा आणि पुढे चला.

मिथुन- अफवा उठतील.

विनाकारण त्रास, कटकटी मागे लावून घेऊ नका. आपल्या राशीला निष्फळ बोलण्याची किंवा बडबड करण्याची सवय आहे. ती आज टाळा. काही गैर अर्थ निघून आपल्याविषयी अफवा उठतील.

कर्क -विविध प्रकारच्या लाभांचा आजचा दिवस.

"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" लोकांशी कनेक्ट राहा. त्यातून तुम्हाला फायदा होईल. विविध प्रकारच्या लाभांचा आजचा दिवस आहे, त्याचा लाभ घ्या.

सिंह- कामातून ताणतणाव वाढेल.

कामाच्या ठिकाणी रास सिंह असली तरी आज वाघ होऊन काम कराल. एकत्रितरित्या भरपूर कामे आल्यामुळे ताणतणाव वाढेल. पण नेटाने सामोरे जा. यश,सन्मान, कीर्ती पदरात पडेल.

कन्या -द्विधा मनस्थिती टाळा.

"देवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी" आजचा असा दिवस आहे. द्विधा मनस्थिती टाळा. योग्य ते निर्णय घ्या आणि देवाचे नाव मुखामध्ये राहू दे.

तूळ - पैसा मोठ्या प्रमाणात मिळण्याचे योग.

पैशाचे विचार हे कायमच आपल्याला येत असतात. वैश्य प्रवृत्तीची रास आहे. आज अचानक पैसा मोठ्या प्रमाणात मिळण्याचे योग आहेत. पण लक्षात ठेवा हा पैसा वाम मार्गातून आलेला नको. मनस्थिती आणि परिस्थिती दोन्ही नीट हाताळा.

वृश्चिक - जोडीदाराबरोबर चांगले संबंध.

परदेश प्रवासाचे बेत आखत असाल तर आज त्याला यश मिळेल. जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. आज अबोला न धरता बोलून कामे होण्याचा दिवस आहे.

धनु - गुप्त शत्रूंवर मात.

शनी महाराजांची विशेष उपासना करा. तब्येतीच्या तक्रारी टाळता येतील. शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि शनी जप करा. गुप्त शत्रूंवर मात कराल.

मकर - आनंदी राहा.

खरंतर तशी रसिक असणारी आपली रास पण आज थोडी रस्तिकता वाटेल. प्रेमप्रणयाच्या गोष्टीमध्ये यश मिळेल, रस वाटेल. शांत न राहता आनंदी राहा दिवस चांगला राहील.

कुंभ -कामे मार्गी लागतील.

मनस्थिती चांगली राहील. कामे मार्गी लागतील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. विशेषत्वाने शिव उपासना करा दिवस चांगलाच आहे.

मीन- जवळचे प्रवास घडतील.

साधी भोळी आपली रास काही गोष्टींना न लपवता इतर पारदर्शकता ठेवून नाती जपता. म्हणूनच आज या नात्यातील गोडवा भावंडांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. बहिणीचे विशेष प्रेम लाभेल. पत्रव्यवहार मार्गी लागतील. जवळचे प्रवास घडतील.

ज्योतिषाचार्य अंजली पोतदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं महागलं की स्वस्त झालं? वाचा २४ कॅरेट १० तोळं सोन्याचा दर

kumbha Rashi : हितशत्रूंशी सामना, पण धनलाभाचेही योग! कसा असेल कुंभ राशीचा शुक्रवार?

Maratha Reservation : १० टक्के आरक्षण नको का? भुजबळांचा मराठा समाजाला सवाल

OBC Reservation : मराठा समाजाच्या कुणबी नोंदी उर्दू, फारसी, इंग्रजीत प्रमाणपत्र इंग्रजीत | VIDEO

Uterine Cyst: कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय गर्भाशयातील गाठीवर होणार उपचार; 'या' उपायांनी महिलांना मिळेल आराम

SCROLL FOR NEXT