Horoscope Today 31th May 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : आज 'या' राशीच्या मनासारख्या घटना घडतील; मे महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल?

Daily Horoscope 31 May 2024 : ग्रहमानाची दररोज अदलाबदल होत असते, याचा थेट परिणाम राशीवर होतो, महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुमच्या नशिबात काय लिहलंय? जाणून घ्या राशी भविष्याच्या माध्यमातून...

Anjali Potdar

आजचे पंचांग ३१ मे २०२४

तिथी - कृष्ण अष्टमी. वार - शुक्रवार. नक्षत्र शततारका ०६.१४ पर्यंत नंतर उभा. योग - विषकंभ. करण - कौलव. रास - कुंभ २३.१० नंतर मीन. दिनविशेष - चांगला दिवस.

मेष : मन विचलित होईल

"देव आलाय द्यायला झोळी नाही घ्यायला" अशी काही ची आजची अवस्था आहे. नक्की काय करायचं आणि काय नाही? आपल्याला काय मिळाले/नाही हेच कोडं उलगडणार नाही त्यामुळे अस्वस्थ असाल.

वृषभ : प्रेरणादायी राहाल

आपल्या स्वभावातच मुळात रसिकता आहे. त्यामुळे आज अनेक गोष्टी करण्यासाठी प्रेरणादायी राहाल. पैशांचा योग्य विनियोग आणि आनंद याचा समतोल साधा.

मिथुन : लोके भाळून जातील

"म्हणतात ना इथून -तिथून मिथुन" अशी आपली रास आहे. बोलून सगळ्यांना गार करणारी. कामाच्या ठिकाणी आज असेच आपल्या बोलण्याने लोके भाळून जातील. त्यातून पुढील कामे मिळतील.

कर्क : इच्छांना बळ येईल

भगवंताची ओढ अनावर होईल. दानधर्म, अध्यात्म यामध्ये आजचा दिवस मग्न राहील. इच्छांना बळ येईल त्याच गोष्टी कराल. मनस्वास्थ लाभेल.

सिंह : अडचणींचा पाठपुरावा करा

"धोंड उशाशी" असा आपला दिवस राहील. म्हणजेच काय अडचणींचा पाठपुरावा करावा लागेल. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक श्रम होतील.

कन्या : चांगले फळ मिळेल

"पेरेल तसे उगवते" असा आजचा दिवस आहे. चार गोष्टी चांगल्या केल्या असतील तर त्याचे फळ आज मिळणार आहे. प्रवासासाठी दिवस चांगला.

तूळ : नोकरीत कटकटीचा दिवस

गुप्त शत्रू त्रास देतील. नाहक आपल्याविषयी चर्चांना उधाण येईल. नोकरी व्यवसायामध्ये कटकटीचा दिवस राहील. म्हणून मनस्वास्थ्य जपा.

वृश्चिक : मनासारख्या गोष्टी घडतील

"स्वप्नात रंगले मी" असा आजचा दिवस राहणार आहे. अनेक गोष्टी उराशी बाळगून आजचा दिवस आलेला आहे. त्या गोष्टी मनासारख्या पूर्ण होतील.

धनु : समज येण्याचा दिवस

"करून सावरून भागले आणि देवपूजेला लागले" असा आजचा दिवस राहणार आहे. इतरांचे करून नंतर लक्षात येईल की अरे स्वतःसाठी जगणं राहून गेले. ही समज येण्याचा आजचा दिवस आहे.

मकर : मनात सुंदर विचार येतील

मनामध्ये काही सुंदर विचार सुचतील आणि म्हणूनच पेन आणि लेखणी घेऊन कामाला लागा. त्याच्यासाठी दिवस चांगला. भावंडांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : निर्णय घेण्याचा दिवस

विनाकारण होणारी ससेहोलपट थांबवा. पैसा का काम? का आनंद? यातला निर्णय घेण्याचा आजचा दिवस. खूपदा पैसा असून आनंद नसतो पण पैसा नसून सुख असते ही गोष्ट समजेल तो आजचा दिवस.

मीन : स्वतःकडे विशेष लक्ष द्याल

स्वतःकडे विशेष लक्ष द्याल. वस्त्र अलंकार यांनी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसावे अशी आज इच्छा होईल. अर्थात मन फुलवणारा आजचा दिवस आहे.

ज्योतिषशास्त्री अंजली पोतदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

SCROLL FOR NEXT