Rashi Bhavishya 19 July 2024  Saam Tv
राशिभविष्य

Horoscope 19 July 2024: आजचे राशीभविष्य; नोकर-चाकरांपासून सावध राहा, 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खडतर

Rashi Bhavishya Friday: आज अनेक लोकांना आर्थिक लाभ होण्याच्या संधी आहेत. आपण १९ जुलैचे राशीभविष्य जाणून घेवू या.

Anjali Potdar

आजचे पंचांग १९ जुलै २०२४

शुक्रवार दिनांक- १९ जुलै २०२४, आषाढ शुक्लपक्ष, तिथी- त्रयोदशी, नक्षत्र- मूळ, योग-ऐंद्र, करण-कौलव, रास -धनु, दिनविशेष-चांगला दिवस

मेष - तीर्थयात्रा घडतील

मोठ्या प्रवासाच्या दृष्टीने आखणी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. दानधर्म आणि व्रतवैकल्ये यामध्ये आजचा दिवस जाईल. तीर्थयात्रा घडतील.

वृषभ - थोडा कटकटीचा आणि त्रासाचा दिवस

थोडा कटकटीचा आणि त्रासाचा दिवस राहणार आहे. पैशाच्या बाबतीत मोठ्या उड्या घेऊ नका. भ्रष्ट पैशापासून सावध राहण्याचा आज इशारा आहे. शरीर आणि मनस्वास्थ्य जपा.

मिथुन - व्यवसायात वाढ होईल.

कोटकचेरीचे निकाल मनाप्रमाणे लागतील. एकूणच होणाऱ्या सर्व नवीन गोष्टीची नव्याने पायाभरणी होईल. भागीदाराकडून योग्य ते सहकार्य मिळेल. व्यवसायात वाढ होईल.

कर्क - नोकरांपासून सावध रहा

नोकर, चाकर यांपासून सावध रहा. चोरी, वस्तू गहाळ होणे, याचा आजचा दिवस दिसतो आहे. तब्येतीच्या तक्रारी आणि आजार वाढतील.

सिंह- संततीसौख्य लाभेल

केलेली उपासना श्रेष्ठ ठरणार आहे. कुलस्वामिनीची आणि रवी उपासना विशेष फलदायी ठरेल. संतती आणि संपत्ती सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. कला मनोरंजन यामध्ये मन रमेल.

कन्या- घरातील कामे मार्गी लागतील.

"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" असा दिवस आहे. सर्वांच्या सहकार्याने घरातील कामे मार्गी लागतील. जुन्याचे नवीन करण्याच्या गोष्टींची आखणी होईल. वाहन सौख्य चांगले.

तूळ- सुसंधी असलेला दिवस

छोटे प्रवास होतील. पत्रव्यवहार मार्गी लागतील. जे ठरवाल त्यामध्ये यश मिळेल. भावंडांचे सहकार्याने पुढे जाल. एकूणच आजचा दिवस सुसंधी घेऊन येणार आहे.

वृश्चिक-कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण

पैशाची आवाक जावक चांगली राहील. कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील. नवीन काहीतरी खाणे पिणे, एकत्रित रित्या आनंद लुटणे अशा गोष्टी मनात येतील आणि त्या पारही पडतील.

धनु- कामे योग्य वेळेत पार पडतील.

सकारात्मकता वाढेल. तब्येतही चांगली राहील. इतरांना घेऊन बरोबर केल्याने आजची कामे योग्य वेळेत पार पडतील. त्यांना तुमच्यापासून फायदा होईल.

मकर- मनस्थिती थोडीशी विधायक

मनस्थिती थोडीशी विधायक राहील. मनात घडणाऱ्या घटना "सांगताही येत नाही सोसता ही येत नाही" अशा पद्धतीच्या राहतील. बंधन योगासाठी दिवस बोलका आहे.

कुंभ- नवीन गोष्टी घडतील

नातेवाईक आणि मित्रांचे सहकार्य राहील. नवीन गोष्टी आणि योजना अमलात आणाल. केलेले श्रम वाया गेले नाहीत, याची आज जाणीव होईल.

मीन- पुढे चालत राहा.

"खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी" अशा काही गोष्टी आज मनात धरू नका. समोर येणाऱ्या कामाशी दोन हात करा आणि पुढे चला. तरच कीर्ती आणि प्रसिद्धी आपल्या पदरी पडेल.

ज्योतिषाचार्य अंजली पोतदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT