Today's lucky zodiac signs saam tv
राशिभविष्य

Shravan Nakshatra Horoscope: आजचा दिवस ठरणार शुभ! शनिवारी श्रवण नक्षत्रात ‘या’ चार राशींवर राहणार ग्रहांची विशेष कृपा

Auspicious Saturday Astrology: शनिवार, दिनांक ०४ ऑक्टोबर २०२५, श्रावण नक्षत्राच्या शुभ योगामुळे काही राशींसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. शनिवार हा शनिदेवाचा (Shani Dev) दिवस आहे आणि श्रावण नक्षत्राचे अधिपती भगवान विष्णू आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आज ४ ऑक्टोबर २०२५ शनिवारचा दिवस आहे. आश्विन शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असून हा दिवस धार्मिकदृष्ट्या आणि व्यवहारिक दृष्ट्याही शुभ मानला जातो. एकादशीच्या उपवासानंतर हा दिवस असून अनेक ठिकाणी पूजन, दानधर्म आणि धार्मिक विधी पार पाडले जातात.

कशी आहे आज ग्रहांची स्थिती?

आज चंद्र मकर राशीत भ्रमण करत असून श्रवण नक्षत्रात आहे. शनिवारी श्रवण नक्षत्राचा योग तयार झाल्यामुळे धार्मिक कार्य, दीर्घकालीन नियोजन, आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाच्या कामांसाठी आजचा दिवस अनुकूल मानला जातो. खास गोष्ट म्हणजे काही राशींवर आज ग्रहांची विशेष कृपा राहणार असून कामकाजात प्रगती, मानसिक स्थैर्य आणि आर्थिक लाभाची संधी निर्माण होणार आहे.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या योग्य वेळी घेतलेले निर्णय आज दीर्घकालीन यशाची दिशा दाखवू शकतात. जाणून घेऊया आजचं सविस्तर पंचांग, शुभ मुहूर्त आणि कोणत्या राशींना आजचा दिवस विशेष लाभदायक ठरणार आहे.

पंचांग माहिती

  • तारीख: ४ ऑक्टोबर २०२५, शनिवार

  • तिथी: आश्विन शुक्ल द्वादशी

  • वार: शनिवार

  • नक्षत्र: श्रवण नक्षत्र

  • योग: सिद्धी योग

  • चंद्र राशी: मकर

  • सूर्य राशी: कन्या

  • सूर्योदय: सकाळी ६:२३

  • सूर्यास्त: सायंकाळी ६:०७

शुभ मुहूर्त आणि राहुकाल

  • अभिजित मुहूर्त: सकाळी ११:४७ ते १२:३४ हा काळ कोणत्याही शुभ कार्यासाठी अनुकूल

  • गुलिक काल: सकाळी ७:३० ते ९:००

  • राहुकाल: सकाळी ९:०० ते १०:३० या काळात शुभ कार्य टाळावीत

  • ब्राह्म मुहूर्त: सकाळी ४:४८ ते ५:३५

  • दुर्मुहूर्त: सकाळी ६:३० ते ७:१५ आणि संध्याकाळी ५:३० ते ६:१५

  • वर्ज्य काल: दुपारी १:३० ते ३:१०

आजचा दिवस लाभदायक असलेल्या चार राशी

वृषभ राशी

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आर्थिक व्यवहारांसाठी चांगला असणार आहे. यावेळी तुमची काही कामं अडकलेली असतील तर ती पूर्ण होणार आहेत. वरिष्ठांचा सहकार्य लाभणार आहे.

सिंह राशी

सिंह राशीच्या व्यक्तींना आज आत्मविश्वास वाढणार आहे. या वेळी तुमची महत्त्वाची कामं पटापट होणार आहेत. समाजातील प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे लोक भेटतील ज्यातून भविष्यात लाभ होणार आहे.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिक समाधान देणारा आहे. धार्मिक कार्यात सहभाग होण्याची संधी मिळेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक स्थिती स्थिर राहील आणि नवे निर्णय घेण्यासाठी हा दिवस योग्य आहे.

मकर राशी

मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास, सकारात्मकता आणि निर्णयक्षमता वाढणार आहे. कामकाजात प्रगती होईल, वरिष्ठांचा पाठिंबा लाभणार आहे. आर्थिक व्यवहारांमध्येही लाभ मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

Nagpur Farmer Protest : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर रेल्वे बंद करू; बच्चू कडू यांचा फडणवीस सरकारला इशारा, VIDEO

Maharashtra Politics: पक्षानंतर आता पदही सोडलं; अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT