Today's astrology prediction saam tv
राशिभविष्य

Astrology today: आजचा दिवस खास! एकादशी योग, शुभ नक्षत्र आणि चार राशींवर मिळणार ग्रहांचा जबरदस्त आशीर्वाद

Planetary blessings for zodiac signs: आजचा दिवस धार्मिक आणि ज्योतिषीय अशा दोन्ही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि खास आहे. आज पवित्र एकादशी तिथी असून, तिला विशिष्ट शुभ योग आणि नक्षत्रांची जोड मिळाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज ३ ऑक्टोबर २०२५ शुक्रवारचा दिवस आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून आजचा दिवस धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जातो. दसऱ्यानंतर हा पहिलाच एकादशीचा व्रत असल्यामुळे भक्तिभावाने पूजा, व्रत आणि नामस्मरण करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे.

आजच्या दिवशी कशी आहे ग्रहांची स्थिती?

आजच्या दिवसाचे ग्रहस्थितीवर लक्ष दिल्यास सूर्य कन्या राशीत आणि चंद्र मकर राशीत भ्रमण करतोय. उत्तराषाढा नक्षत्रानंतर श्रवण नक्षत्राची सुरुवात होतेय. काही शुभ योग तयार होत असून नव्या कामांची सुरुवात, धार्मिक कार्यक्रम, दानधर्म, व्यवसायिक निर्णय किंवा वैयक्तिक महत्त्वाची पावलं उचलण्यासाठी हा दिवस अनुकूल मानला जातोय.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, विशेषत: चार राशींवर आज ग्रहांचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे आज अनेकांना प्रगतीचे दरवाजे खुले होणार आहेत.

पंचांग माहिती

  • तारीख: ३ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार

  • तिथी: आश्विन शुक्ल एकादशी

  • वार: शुक्रवार

  • नक्षत्र: श्रवण नक्षत्र

  • योग: सिद्धी योग

  • चंद्र राशी: मकर

  • सूर्य राशी: कन्या

  • सूर्योदय: सकाळी ६:२२

  • सूर्यास्त: सायंकाळी ६:०८

शुभ मुहूर्त व राहुकाल

  • अभिजित मुहूर्त: सकाळी ११:४७ ते १२:३४ (कोणत्याही शुभ कार्यासाठी अनुकूल वेळ)

  • गुलिक काल: सकाळी १०:३० ते १२:००

  • राहुकाल: सकाळी १०:३० ते १२:०० (या काळात शुभ कार्य टाळावीत)

  • ब्राह्म मुहूर्त: सकाळी ४:४८ ते ५:३५

  • दुर्मुहूर्त: सकाळी ९:३८ ते १०:२७ आणि रात्री १०:४८ ते ११:३६

  • वर्ज्य काल: दुपारी १:४५ ते ३:२५

आजचा दिवस लाभदायक असलेल्या चार राशी

मिथुन राशी

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल असणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची संधी मिळम्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी नवीन संपर्कांमुळे पुढील काळात लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

कन्या राशीच्या व्यक्तींना आज आर्थिकदृष्ट्या फायदा मिळणार आहे. या काळात तुमच्या कामात गती येणार आहे. पूर्वी अडकलेली कामं मार्गी लागण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण लाभतील.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवे निर्णय घेण्यासाठी उत्तम असणार आहे. आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्हाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळणार आहे. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ज्यामुळे मानसिक समाधानही मिळणार आहे.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मानसिक शांतता घेऊन येईल. जुने तणाव कमी होणार आहे. महत्त्वाच्या चर्चेत तुमचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. आर्थिक दृष्ट्याही काही शुभ घडामोडी होऊ शकणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Toranmal: महाराष्ट्रातील दुसरे थंड हवेचे ठिकाण, मुंबईहून तोरणमाळला कसे जायचे? जाणून घ्या सर्वोत्तम मार्ग

महिला डॉक्टरला न्याय न मिळाल्यास ८३ वर्षांचे माजी आमदार काठीच्या आधारावर बीड ते फलटण पायी जाणार|VIDEO

Satara Picnic Spot: हिवाळ्यात पार्टनरसोबत फिरायला जायचंय? या ५ ठिकाणांना नक्की भेट द्या

EDLI News: नोकरदारांच्या कामाची बातमी ! 'या' कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना EPFO देणार ₹७ लाख; नेमकी स्कीम आहे तरी काय?

काँग्रेसचा अजित पवारांना धक्का, बड्या नेत्यासह ३७ जणांचा राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र

SCROLL FOR NEXT