Panchang today horoscope SAAM TV
राशिभविष्य

Panchang today horoscope: आजचा दिवस बदल घडवणारा! मकर राशीत चंद्र; कोणाला मिळणार यश आणि धनलाभ?

Panchang Today Success Financial Gain Zodiac Signs: आजचे पंचांग विशेष ग्रहस्थिती दर्शवत आहे. काही राशींवर शुभ ग्रहयोगांचा प्रभाव पडणार असून त्यांना यश, आर्थिक लाभ आणि प्रगतीची संधी मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज २३ डिसेंबर २०२५ असून वर्षाच्या शेवटाकडे जात असताना हा दिवस आत्मचिंतन, नियोजन आणि पुढील उद्दिष्टं ठरवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातोय. चंद्र आज मकर राशीत असल्याने कामाच्या ठिकाणी शिस्त, जबाबदारी आणि व्यवहारिक दृष्टिकोन वाढू शकतो. आर्थिक निर्णय, कार्यालयीन कामं त्याचप्रमाणे दीर्घकालीन योजनांवर विचार करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल ठरू शकणार आहे.

आजचं पंचांग

  • तिथि: शुक्ल तृतीया

  • नक्षत्र: श्रावण

  • करण: गर

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • योग: व्याघात

  • दिन: मंगळवार

  • सूर्योदय: 07:01:20 AM

  • सूर्यास्त: 05:31:21 PM

  • चंद्र उदय: 09:32:29 AM

  • चंद्रास्त: 08:27:28 PM

  • चंद्र राशी: मकर

  • ऋतु: हेमंत

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): पौष

  • माह (पुर्निमान्ता): पौष

अशुभ काल

राहुकाल: 02:53:51 PM ते 04:12:36 PM

यमघंट काल: 09:38:51 AM ते 10:57:36 AM

गुलिकाल: 12:16:21 PM ते 01:35:06 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त: 11:55:00 AM ते 12:37:00 PM

या राशींसाठी आजचा दिवस ठरणार लकी

मकर राशी

चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढणार आहे. कामातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू शकणार आहात. वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला मिळणार आहे.

वृषभ राशी

आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत आहेत. गुंतवणूक किंवा बचतीचे निर्णय लाभदायक ठरू शकतात. कुटुंबातील वातावरण शांत आणि समाधानकारक राहणार आहे.

कन्या राशी

नियोजन आणि मेहनतीचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. आरोग्य सुधारेल आणि मन प्रसन्न राहणार आहे.

मीन राशी

मानसिक शांतता आणि सर्जनशीलता वाढण्याची शक्यता आहे. मित्र आणि इतरांकडून तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. आज घेतलेले निर्णय पुढील काळात फायदेशीर ठरू शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोळ्यांत अश्रू, हातात पेन; वडिलांचं पार्थिव घरात ठेवून लेकीने दिला दहावीचा पेपर

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट

Poha Chivda : चहासोबत खायला बनवा चटपटीत पोह्याचा चिवडा, कसा बनवायचा?

Facial Hair Removal Tips: चेहऱ्यावरचे बारीक बारीक केस कसे काढायचे?

Maharashtra Live News Update: पुण्यात हडपसर येथील भीषण आगीत १९ झोपड्या जळून खाक

SCROLL FOR NEXT